साकतमध्ये आज ह. भ. प. प्रकाश महाराज बोधले यांच्या काल्याच्या किर्तनाने होणार सप्ताहाची सांगता

0
156

जामखेड न्युज——

साकतमध्ये आज ह. भ. प. प्रकाश महाराज बोधले यांच्या काल्याच्या किर्तनाने होणार सप्ताहाची सांगता

 

अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष व पैठणच्या संतपीठाचे पीठाचार्य ह. भ. प. यमकाचार्य प्रकाश महाराज बोधले यांच्या काल्याच्या किर्तनाने आज सप्ताहाची सांगता होणार आहे तरी भाविक भक्तांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन सप्ताह समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

जामखेड तालुक्यातील साकतची ओळख प्रतिपंढरपूर म्हणून आहे. येथे अखंड विणा वादणास व नंदादीपास ६८ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल तसेच संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या सप्तशत्तकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त, आखील भारतीय वारकरी मंडळ प्रेरित आज गुरूवार दि. १६ एप्रिल पासून भव्य- दिव्य अखंड हरिनाम सप्ताहात सुरूवात झाली आहे.


हभप माऊली महाराज कोल्हे, हभप भिमराव महाराज मुरूमकर, बाबा महाराज मुरूमकर, ज्ञानदेव मुरूमकर, अतुल दळवी, आश्रू सरोदे, रामभाऊ मुरूमकर, आश्रू मुरूमकर, यांच्या सह सप्ताहासाठी गायनाचार्य म्हणून हभप हरिभाऊ महाराज काळे, माऊली महाराज कोल्हे, हभप माऊली महाराज गाडे, हभप दादा महाराज सातपुते, हभप काका महाराज निगुडे, हभप पंढरीनाथ महाराज राजगुरू, हभप दिनकर महाराज मुरूमकर, हभप गहिनीनाथ सकुंडे, हभप अशोक महाराज सपकाळ, विठ्ठल भजनी मंडळ, श्री साकेश्वर भजनी मंडळ, हभप प्रकाश महाराज बोधले यांच्या फडावरील भजनी मंडळ यांच्या मुळे परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.
आज अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष व पैठणच्या संतपीठाचे पीठाचार्य ह. भ. प. यमकाचार्य प्रकाश महाराज बोधले यांच्या काल्याच्या किर्तनाने आज सप्ताहाची सांगता होणार आहे.

सप्ताहामध्ये दैनिक कार्यक्रम

श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे व्यासपीठ चालक हभप माऊली महाराज कोल्हे असतील तर दररोज पहाटे ४ ते ६ गाथाभजन, सकाळी ६ ते ७ विष्णुसहस्रनाम, ७ ते १० ज्ञानेश्वरी पारायण, १० ते १२ गाथा भजन, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ, ९ ते ११ हरिकिर्तन, ११ ते ४ हरिजागर असा दिनक्रम असे झाले

पुढीलप्रमाणे मान्यवर कीर्तनकारांची किर्तनसेवा झाली

गुरूवार दि १६ एप्रिल रोजी कर्जत येथील विनोदाचार्य हभप आक्रुर महाराज साखरे

शुक्रवार दि. १७ रोजी डिकसळ येथील हभप आण्णासाहेब महाराज बोधले,

शनिवार दि. १८ रोजी कर्जत येथील हभप प्रकाश महाराज जंजिरे

रविवार दि. १९ रोजी भूम येथील हभप अतिश महाराज कदम

सोमवार दि. २० रोजी पंढरपूर येथील ज्ञानसिंधू हभप जयवंत महाराज बोधले
वरील मान्यवर कीर्तनकारांची कीर्तने झाली.

रात्री मंगळवार दि. २१ रोजी बीड येथील हभप महादेव महाराज राऊत यांचे किर्तन झाले.

बुधवारी दि. २२ रोजी नागपूर येथील प्रसिद्ध रामायणाचार्य हभप रामराव महाराज ढोक यांचे किर्तन झाले यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

आज महाराष्ट्रातील प्रसिद्ध अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष व पैठणच्या संतपीठाचे पीठाचार्य ह. भ. प. यमकाचार्य प्रकाश महाराज बोधले यांच्या काल्याच्या किर्तनाने आज सप्ताहाची सांगता होणार आहे

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here