जामखेड न्युज——
छत्रपतींचे जीवनचरित्र अभ्यासावे’- पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड
संघर्ष मित्र मंडळाच्या वतीने शिवजयंती साजरी

‘छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराला रक्ताचा अभिषेक करून स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. स्वराज्यात त्यांनी दीनदुबळ्यांना, कष्टकरी शेतकऱ्यांना न्याय दिला. महाराजांनी केव्हाही जातीयवाद केला नाही. छत्रपतींचे कार्य, कर्तृत्व समजून घेण्यासाठी त्यांचे जीवनचरित्र अभ्यासले पाहिजे,’ असे मत लीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, यांनी व्यक्त केले.

शहरातील कोर्ट रोड वरील संघर्ष मित्र मंडळाच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, नायब तहसीलदार परमेश्वर पाचारणेयांच्या हस्ते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी पत्रकार अशोक निमोणकर. नासिर पठाण,ओंकार दळवी,समीर शेख,अविनाश बोधले,पप्पूभाई सय्यद,धनराज पवार,पांडुरंग भोसले,मंडळाचे अध्यक्ष चेतन राळेभात,संतोष निमोणकर,विशाल लोळगे,स्वप्नील बरबडे,किरण भोरे, दिपक ढोले दादा कलासागर. आण्णा भोसले श्रीधर सिद्धेश्वर,जितेंद्र आढाव,धनंजय भोसले आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,यावेळी शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात जयंती उत्सव साजरी करण्यात आली




