जामखेडमध्ये जपला जातोय शिवकालीन युद्धकलेचा वारसा शिवजन्मोत्सव समिती आयोजित मोफत शिवकालीन शस्त्रकला प्रशिक्षण शिबिर

0
413

जामखेड न्युज——

जामखेडमध्ये जपला जातोय शिवकालीन युद्धकलेचा वारसा

शिवजन्मोत्सव समिती आयोजित मोफत शिवकालीन शस्त्रकला प्रशिक्षण शिबिर

सध्याच्या काळात आधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर वाढला असला तरी जगभरात भारतीय प्राचीन युद्धकलेचे महत्त्व सर्वश्रुत आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी जोपासलेल्या शिवकालीन कला आणि शस्त्रविद्येला ऐतिहासिक महत्त्व आहे. मात्र, आधुनिक काळात जगभरात नावाजलेली भारतीय प्राचीन युद्धकला ही काळाच्या ओघात लोप पावत चालली आहे. तेव्हा भारताच्या या प्राचीन युद्धकलेला जिवंत ठेवत तसेच स्व संरक्षणासाठी तिचा वसा जपण्याचे काम जामखेड मधील शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने करण्यात येत आहे.

महिला आयोजित शिवजन्मोउसत्व समिती जामखेड सौ. रोहिणी संजय काशिद व त्यांच्या सहकारी मिना अविनाश बेलेकर, कांचन प्रकाश दहितोंडे, सोनाली पांडुरंग भोसले यांच्या सहकाऱ्यांनी मोफत शिवकालीन शस्त्रकला प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे.

 

यात ६ ते ४० वयोगटातील महिला प्रशिक्षणार्थींच्या उत्स्फूर्त सहभाग आहे. दि. १ डिसेंबर ते १५ डिसेंबर पर्यंत लोकमान्य मराठी शाळेत हे प्रशिक्षण आयोजित केले आहे.

जोती राजेन्द्र बेल्हेकर बालविकास अधिकारी जामखेड, सौ, तनुजा सुशील पन्हाळकर, सौ, डॉ स्वेताताई शिंदे, सौ. प्रभाताई रासकर, सौ.योगिता नीलेश भोसले, श्रद्धा जगताप, सौ. साक्षी जाधव, सौ. वैशाली शिंदे, सौ. दिपाली भोसले यांच्या सह आयोजक महिला आयोजित शिवजन्मोउसत्व समिती जामखेड सौ. रोहिणी संजय काशिद व त्यांच्या सहकारी मिना अविनाश बेलेकर, कांचन प्रकाश दहितोंडे, सोनाली पांडुरंग भोसले यांनी शिवकालीन शस्त्रकला प्रशिक्षण आयोजित केलेले आहे.

यात विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या महिलांचे मार्गदर्शन लाभत आहे. महिला व बालकल्याण अधिकारी दररोज मार्गदर्शन करतात. अशा प्रशिक्षणामुळे महिला व मुलींच्या छेडछाडीला निश्चितच आळा बसेल 

प्रशिक्षणादरम्यान येथे युद्धकला, तसेच एखादे शस्त्र शिकवण्याआधी प्रशिक्षकांकडून त्या मागील इतिहास, शस्त्र वापरायचे तंत्र, ते कोणत्या धातूंनी बनवले जाते, इत्यादी शस्त्रासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाते. प्रशिक्षणात सर्वप्रथम सर्व शस्त्रांचे मूळ असणाऱ्या काठीचे प्रशिक्षण दिले जाते. काठीमध्ये पारंगत झाल्यानंतर प्रशिक्षणार्थींना धार नसलेली तलवार, भाला, दांडपट्टा, विटी, माडू, खंजीर लढत, जांबिया लढत, काठी बंदीश, रुमाल बंदिश इत्यादी शस्त्र आणि युद्धकलेतील प्रकार शिकवले जातात.

लोप पावत चाललेली ही प्राचीन युद्ध कला जनमानसापर्यंत पोहचावी याकरता शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने ६ ते ४० वयोगटातील मुली व महिलांसाठी हे प्रशिक्षण आयोजित केले आहे.

 

प्राचीन युद्धकलेचे प्रशिक्षण घेतल्यामुळे ही कला जपली जातेच, मात्र त्यासोबतच शस्त्र शिकल्याने कोणत्याही परिस्थितीत स्वतःवर संयम राखण्यासाठी देखील याचा फायदा होतो. शस्त्र शिकल्यामुळे आपल्यातील ताकदीविषयी जाण येऊन ती कुठे आणि कशा प्रकारे वापरायची हे समजायला मदत होते. तसेच प्राचीन युद्धकलेत पारंगत झाल्यामुळे आत्मविश्वास वाढून यामुळे महिला सशक्तीकरणालाही बळ मिळते.-
शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here