जामखेड न्युज——
भूम येथे कुलवंत वाणी समाजाचा ऐतिहासिक मेळावा २०२२ उत्साहात संपन्न..!
कुलवंत वाणी समाज ट्रस्टच्या सर्व समन्वयक व मेळावा आयोजन समिती भूम यांनी, “एकच ध्यास,समाजाचा विकास” या विचाराने प्रेरित होऊन शनिवार व रविवार दि.३ व ४ डिसेंबर २०२२ रोजी भूम येथे कुलवंत वाणी समाजाचा “राज्यस्तरीय वधू वर परिचय मेळावा,समाजातील मान्यवर सत्कार सोहळा,रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर या दोन दिवसीय सामाजिक कार्यक्रमाचे मराठवाडा विभागात प्रथमच आयोजन केले होते.सदर कार्यक्रम सर्वांगसुंदररित्या यशस्वीपणे, आनंददायी व उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला.
या मेळावा अंतर्गत,शनिवार,दि.३ डिसेंबर २०२२ रोजी राज्यस्तरीय वधू वर परिचय मेळावा, कुलवंत वाणी समाज वधू वर परिचय पुस्तिका-सन २०२२-२३ प्रकाशन,कार्यक्रम अध्यक्ष व सन्मानीय उपस्थिती स्वागत सोहळा, समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर सत्कार,लोकप्रतिनिधी सन्मान,मरणोत्तर समन्वयक सन्मान-२०२२ व रक्तदान शिबीर इत्यादी कार्यक्रम प्रभावीपणे संपन्न झाले.सदर कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी अध्यक्षस्थानी औरंगाबाद येथील प्रसिद्ध उद्योजक मा.श्री.सुरेशशेठ भाऊराव तोडकर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून भूम नगरपरिषदचे गटनेते श्री.संजयनाना गाढवे,सौ.संयोगिता गाढवे(माजी नगराध्यक्षा),मा.मेहराज बेगम सय्यद (माजी नगरसेविका),सौ.वीणाताई सोनवणे(मा.नगराध्यक्षा,नगरपरिषद जेजुरी),डॉ.श्री.विकास वासकर(गोल्डमेडिलिस्ट प्राध्यापक),श्री.अमोल वारघडे साहेब(अधिक्षक,धर्मादाय आयुक्त कार्यालय,अहमदनगर) उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूम येथील समन्वयक श्री.अनिलशेठ तोडकर तसेच कुलवंत वाणी समाज ट्रस्ट विविध उपक्रम,योजना व कार्य याविषयक माहिती प्रभावीरित्या जामखेड येथील समन्वयक श्री.प्रशांत होळकर सर यांनी दिली.अध्यक्ष व उपस्थित मान्यवर यांनी अनमोल असे मार्गदर्शन केले.कुलवंत वाणी समाज ट्रस्टच्या सर्व समन्वयक यांच्या कार्याचे उपक्रमाचे कौतुक केले.तसेच सर्वांना भूम मेळावा करिता शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाचे उत्कृष्ठ व अभ्यासू वृत्तीने सूत्रसंचालन पुणे येथील समन्वयक श्री.रविंद्र गोलांडे सर यांनी केले.तर सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीगोंदा विभाग समन्वयक डॉ.श्री.संतोष जठार यांनी केले.सदर मेळाव्यात कुलवंत वाणी समाजातील ३७० वधू वर यांनी नोंदणी केली होती.एल.ई.डी. स्क्रीन वरील वधू वर परिचय स्लाईड,मेळावा लाईव्ह इव्हेंट, पोस्टर्स,सेल्फी पॉईंट,रंगोळी,स्वागत कक्ष, भोजन व्यवस्था या सर्व बाबी समाजबांधव व भगिनी यांना आकर्षित करत होत्या.रक्तदान शिबीर अंतर्गत,”रक्त डोनेट करूयात,मानवतेला प्रमोट करूया” ही भावना जोपासत १०३ समाजबांधव व भगिनी यांनी रक्तदान केले.या कार्यक्रमाकरिता १६४० समाजबांधव व भगिनी उपस्थित होते.
*या मेळावा अंतर्गत,रविवार,दि.४ डिसेंबर २०२२ रोजी भारत देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य वर्षानिमित्त, कुलवंत वाणी समाजातील स्वातंत्र्यसैनिक यांच्या कुटुंबियांचा सन्मान,विविध ट्रस्ट विश्वस्त सन्मान,आरोग्य तपासणी शिबीर,मार्गदर्शनपर व्याख्यान इत्यादी कार्यक्रम अप्रतिमरित्या संपन्न झाले.सदर कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी अध्यक्षस्थानी पुणे येथील ज्येष्ठ समाजबांधव तथा बँकिंग क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले श्री.दत्तात्रय गुजर साहेब तसेच सन्मानीय उपस्थिती म्हणून श्री.संभाजीराजे झिरंगे(ज्येष्ठ समाजबांधव व सामाजिक कार्यकर्ते, सासवड),श्री.अशोक काका बसाळे(समन्वयक, सुपे),श्री. शिवाजीराव होळकर(ज्येष्ठ समाजबांधव,भूम),श्री.संजनाताई चौधरी(नगरसेविका, नगरपंचायत वाशी) उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जामखेड येथील समन्वयक श्री.प्रशांत होळकर सर यांनी केले.कार्यक्रम अध्यक्ष व प्रमुख मान्यवर यांनी उपस्थित समाजबांधव व भगिनी करिता अनुभवयुक्त मोलाचे मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुणे येथील समन्वयक श्री.रविंद्र गोलांडे सर व श्री होळकर सर यांनी संयुक्तपणे केले.भागवत एकादशी निमित्त,”कानडा राजा पंढरीचा” या भक्तीगीताचे तसेच स्वातंत्र्यसैनिक कुटुंबीय सन्मान निमित्त,”दिल दिया है,जान भी देंगे,ये वतन तेरे लिये..!” या राष्ट्रभक्तीपर गीताचे श्री.दिपकजी बिडवे सर (समन्वयक अंबाजोगाई) यांनी सुंदररित्या सादरीकरण करत उपस्थित समाजबांधव व भगिनी यांचे अक्षरशः मने जिंकली.कु.हिरणमई होळकर,कु.श्रेया होळकर यांनी स्वागतगीत सादर करत सर्वांचे मने प्रफुल्लीत केले.स्वातंत्र्य सैनिक एल.ई.डी स्क्रीन स्लाईड शो,मंडप व स्टेज डेकोरेटिंग नाविन्यपूर्ण व कल्पक व्यवस्था,डिजिटल बॅनर,भव्यदिव्य सन्मान सोहळा,बैठक व्यवस्था सर्व समाजबांधव व भगिनी आकर्षित करत होती.आरोग्य तपासणी शिबीर अंतर्गत,”मानवसेवा हीच ईश्वरसेवा”हेच ब्रिदवाक्य मनी जोपासत १४० समाजबांधव व भगिनी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.मेळावा यशस्वी करण्यासाठी,मुख्य व महत्वपूर्ण भूमिका बजावणारे भूम येथील सर्व समाजबांधव व भगिनी यांचा सन्मान समन्वयक यांच्या वतीने करण्यात आला.रविवारच्या कार्यक्रमाकरिता ९३० समाजबांधव व भगिनी यांनी उपस्थिती दर्शविली.या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिरूर येथील समन्वयक श्री.भूषणजी कडेकर यांनी केले.तसेच त्यांनी “कुलवंत वाणी समाजाचा पुढील मेळावा सन २०२४ मध्ये अहमदनगर विभागात होणार आहे.” आणि “नूतन(नविन) २०२३ वर्ष ” महिला मेळावा,महिला उद्योजक व व्यवसायिक मार्गदर्शन व प्रशिक्षण व महिला विषयक इतर उपक्रम याकरिता असेल,असे समन्वयक यांच्या वतीने जाहीर केले.
भूम मेळावा २०२२ च्या निमित्ताने एकंदरीत आनंदी,उत्साही,भावूक,सन्मानपूर्वक, आल्हाददायक या समिश्र वातावरणात समाजबांधव,भगिनी व समन्वयक यांच्या अंतर्मनातील अनुभवाचे, त्यांच्या कार्याचे,एकीचे बळ याचे प्रतिबिंब पाहायला मिळाले.कुलवंत वाणी समाजाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहावा असा अविस्मरणीय क्षण, भूम मेळावा २०२२ च्या माध्यमातून प्रत्ययास आला.