संतांच्या संगतीने देवाला सुख झाले म्हणून देव त्यांची सेवा करतात – हभप महेश महाराज माकणीकर वै. रामचंद्र बोधले महाराज पुण्यतिथी निमित्त साकत येथे अखंड हरिनाम सप्ताह

0
163

 

जामखेड न्युज——

संतांच्या संगतीने देवाला सुख झाले म्हणून देव त्यांची सेवा करतात – हभप महेश महाराज माकणीकर

वै. रामचंद्र बोधले महाराज पुण्यतिथी निमित्त साकत येथे अखंड हरिनाम सप्ताह

   
संतांच्या संगतीने देवाला सुख झाले म्हणून देव त्यांची सेवा करतात.ज्या संतांची सेवा देवाला करायला आवडते त्या संतांचे वर्णन करण्या इतका माझा अधिकार काय?जो निर्गुण असा परमात्मा सगुण साकार होऊन संतांची सेवा करतो पूजा करतो आणि त्यांना दंडवत घालतो असे हभप महेश महाराज माकणीकर यांनी वै. रामचंद्र बोधले महाराज पुण्यतिथी निमित्त साकत येथे अखंड हरिनाम सप्ताह चौथी किर्तन सेवा संपन्न झाली. 

यावेळी हभप उत्तम महाराज वराट यांच्या नेतृत्वाखाली
श्री सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त भव्य -दिव्य अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमत भगवतगिता पारायण सोहळ्याची साकत मध्ये मोठ्या दुसऱ्या दिवशीची कीर्तन सेवा ह. भ. प.न्यायाचार्य सत्यवान महाराज लाटे वाघदरा बीड यांची कीर्तन सेवा झाली 

  त्यांनी कीर्तन सेवेसाठी हा अभंग निवडला व त्याचे निरूपण केले. 

संतांचें सुख झालें या देवा । म्हणऊनि सेवा करी त्यांची ॥१॥
तेथें माझा काय कोण तो विचार । वर्णावया पार महिमा त्यांचा ॥ध्रु.॥
निर्गुण आकार जाला गुणवंत । घाली दंडवत पूजोनियां ॥२॥
तीर्थे त्यांची इच्छा करिती नित्यकाळ । व्हावया निर्मळ आपणांसी ॥३॥
अष्टमहासिद्धीचा कोण आला पाड । वागों नेदी आड कोणी तया ॥४॥
तुका म्हणे ते हे बळिया शिरोमणी । राहिले चरणीं निकटवासें ॥५॥
अर्थ
संतांच्या संगतीने देवाला सुख झाले म्हणून देव त्यांची सेवा करतात.ज्या संतांची सेवा देवाला करायला आवडते त्या संतांचे वर्णन करण्या इतका माझा अधिकार काय?जो निर्गुण असा परमात्मा सगुण साकार होऊन संतांची सेवा करतो पूजा करतो आणि त्यांना दंडवत घालतो,तीर्थे स्वत स्वच्छ होण्यासाठी संतांच्या पदस्पर्शाचि इच्छा करतात,पापी लोकांच्या पापाचे हरण करून ते मलीन झालेले असतात व ते निर्मळ होण्यासाठी संतांच्या पदस्पर्शाचि इच्छा करतात. म्हणून तेथे अस्ष्टमहासिद्धीनां कोणी विचारत नाही.त्यांना कोणी जवळ फिरकू देत नाही.त्यांचा अडथळा कोणी जुमानत नाही.तुकाराम महाराज म्हणतात संत हे बलवंत शोरोमणी आहेत.तरीही विठ्ठलाच्या चरणी त्यांनी निकट वास्तव्य केले आहे.

 

 

  कीर्तनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होती कीर्तनासाठी हभप उत्तम महाराज वराट, हभप कैलास महाराज भोरे, बिभीषण महाराज कोकाटे, हभप ज्ञानेश्वर महाराज कोल्हे, हभप हरीभाऊ काळे, दिनकर मुरूमकर, मनोहर मुरूमकर, पुरूषोत्तम मोरे, दत्तू नाना वराट, उत्तरेश्वर वराट, बाजीराव वराट, आश्रम मुरूमकर, दिपक अडसूळ यांच्या सह पारगाव घुमरा, पिंपळवाडी, कोल्हेवाडी, देवदैठण, साकत भजनी मंडळ तसेच नर्मदेश्वर वारकरी शिक्षण संस्था नगर येथील तीस चिमुकले वारकरी यांच्या सह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. 

       सर्व सज्जन भाविक भक्तांना कळविण्यात आनंद होत आहे कि, श्रीगुरू वै. ह. भ. प. प. पु. आदरणीय वंदनीय रामचंद्र बोधले महाराज हे संत शिवाजी बोधले महाराज व संत माणकोजी बोधले महाराज यांच्या वंशातील नववे सत्पुरुष होते. यांनी साकत मध्ये विठ्ठल मंदिरात १ मे १९५५ मध्ये अखंड विनावादन व नंदादीप सुरू केलेली आजपावोती सुरूच आहे. त्यांच्या ४० व्या पुण्यतिथीचे आयोजन ह. भ. प. विवेकानंद भारती उर्फ उत्तम महाराज वराट यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व साकत परिसरातील भक्तगणांच्या सहकार्याने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. 

 महाराष्ट्रातील मान्यवर किर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक येणार आहेत तरी भाविक भक्तांनी या सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन ह. भ. प. उत्तम महाराज वराट यांनी केले आहे.  
आज शनिवार दि. १५ रोजी महेश महाराज माकणीकर लोहारा यांचे किर्तन झाले.

रविवार दि. १६ रोजी ज्ञानेश्वर महाराज कुऱ्हाडे आळंदी
सोमवार दि. १७ रोजी संजयजी महाराज देशमुख
मंगळवार दि. १८ रोजी ज्ञानसिंधु संदिपान महाराज शिंदे
तसेच मंगळावर १८ रोजी दुपारी १२ते २ हभप उत्तम महाराज वराट यांचे गुलालाचे किर्तन तसेच
बुधवार दि १९ रोजी सकाळी १० ते १२ हभप उत्तम महाराज वराट यांचे काल्याचे कीर्तन होईल. 

 

      तरी परिसरातील भाविक भक्तांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन ह. भ. प. उत्तम महाराज वराट यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here