जामखेड न्युज——
सामान्य सभासदांचा फक्त गुरुमाऊली मंडळ 2015 बापूसाहेब तांबे यांच्यावरच विश्वास-केशव गायकवाड (जिल्हा श्रेष्ठी)
अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक व अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक विकास मंडळ या दोन्ही संस्थांच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीनिमित्त जिल्हा श्रेष्ठी केशव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली विकास मंडळाचे उमेदवार मुकुंदराज सातपुते, गुरुमाऊली मंडळाचे युवा नेतृत्व रुपेश वाणी,कार्यकारी अध्यक्ष सचिन पवार, सरचिटणीस रामहरी बांगर, कोषाध्यक्ष भाऊसाहेब डिडूळ, शिक्षक भारतीचे नेते लहू गीते यांच्या प्रमुख उपस्थितीत नायगाव व खर्डा भागात सावरगाव, धोत्री, बांधखडक, वाकी, लोणी,परकडवस्ती, दरडवाडी, महानगरवस्ती, शिकारेवस्ती, पांढरेवाडी, गवळवाडी, गीतेवाडी, गांधनेश्वरवस्ती, मुंगेवाडी,इनामवस्ती, नागोबाचीवाडी, बारगजेवस्ती, खर्डा मुले, खर्डा मुली, शुक्रवार पेठ व सातेफळ येथे प्रचाराचा धुरळा उडवत जंगी विजयाच्या दिशेने आगेकूच केली.
सभासदांच्या सर्व शंकांचे निरसन झालेले असून सभासद बॅंकेच्या कारभारावर खूश आहेत.सर्वच सभासदांशी नेते केशव गायकवाड व विकास मंडळाचे उमेदवार मुकुंदराज सातपुते, खर्डा भागाचे युवा नेतृत्व रुपेश वाणी यांनी मुक्त संवाद साधला.