दोन महिन्यांपुर्वीच बांधलेला पूल गेला वाहुन निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे – दिघोळ माळेवाडी ग्रामस्थ

0
247

 

जामखेड न्युज——

दोन महिन्यांपुर्वीच बांधलेला पूल गेला वाहुन
निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे – दिघोळ माळेवाडी ग्रामस्थ

पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून तालुक्यातील दिघोळ माळेवाडी या गावाला जोडणारा दोन महिन्यांपुर्वीच तयार करण्यात आलेला नवीन पुल ठेकेदारांने केलेल्या निकृष्ट कामामुळे वाहुन गेला सदरचा पुल जामखेड येथील डोंगरे ठेकेदारांने केलेला असल्याचे समजते अशा निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी माळेवाडी दिघोळ ग्रामस्थांनी केली आहे.

जामखेड तालुक्यातील दिघोळ ते माळेवाडी या रस्त्यावर वाजंरा नदीजवळ आमराई ओढ्यावर पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत दोन महिन्यांपुर्वीच कोट्यवधी रुपये खर्च करून सदरचा पुल बांधण्यात आला होता.

जामखेड तालुक्यात गुरूवार दि. ६ रोजी
झालेल्या जोरदार पावसामुळे दिघोळ ते माळवाडी दरम्यान वांजरा नदीच्या जवळ आमराई ओढ्यावर बांधलेला अर्धा पुल अक्षरशः कोसळुन पडला आहे. उर्वरित पुलाच्या खालची माती ढासळत असल्याने त्यावरून वहातूक व नागरिकांना जाणे येणे धोक्याचे झाले आहे. नागरिकांनी ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

दिघोळ ते माळवाडी अशा साडेतीन किमी च्या रस्त्यासह पुलाच्या कामासाठी एक कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. आमराई ओढ्यावरील जुना पुल तोडुन नवा पुल तयार करण्यात होता.सदर पुलाचे काम अवघ्या दोन महिण्यांपुर्वी काम पुर्ण झाले होते. दि ६ रोजी रात्री झालेल्या जोरदार पावसाने ठेकेदाराच्या निकृष्ट कामाचा उत्कृष्ट नमुना दाखवला.

सदर कामाच्या दर्जाची चौकशी होऊन ठेकेदारावर कारवाई करण्याची व दुसरा पुल बांधुन देण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.

या रस्त्याच्या ठिकाणी बांधण्यात आलेल्या पुलाची उंची वाढविण्याची गरज आहे. कमी उंची व अरूंद पुलाबाबत व निकृष्ट कामाबाबत दिघोळ ग्रामस्थांनी उपोषण केले होते. त्यावेळी राजकीय हस्तसेफामुळे उपोषण मागे घेण्यात आले होते. राजकीय वरदहस्तामुळे ठेकेदारावर कोणाचाही वजक नाही त्यामुळे मनमानी पद्धतीने अधिकाऱ्यांना हाताशी धरून निकृष्ट दर्जाचे काम केले होते. कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेला पूल दोनच महिन्यात खचला त्यामुळे सदरचे काम निकृष्ट असल्याने संबंधित ठेकेदार, अधिकारी व अभियंता यांची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी व ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here