जनतेच्या मनातील शिवसेनेचा आवाज कोणीही गोठवू शकत नाही – आमदार रोहित पवार नगरसेवक मोहन पवार आयोजित संतोषी माता मंदिरात आमदार रोहित पवारांच्या हस्ते महाआरती व प्रसाद वाटप

0
208

 

जामखेड न्युज——

जनतेच्या मनातील शिवसेनेचा आवाज कोणीही गोठवू शकत नाही – आमदार रोहित पवार

नगरसेवक मोहन पवार आयोजित संतोषी माता मंदिरात आमदार रोहित पवारांच्या हस्ते महाआरती
व प्रसाद वाटप

निष्ठावान शिवसैनिकांच्या मना मनात व नसानसात आजही शिवसेनाच आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत दिसेल निवडणूक आयोगाने शिवसेना नाव व चिन्ह गोठवले तरी जनतेच्या मनातील शिवसेनेचा आवाज कोणीही गोठवू शकत नाही असे आमदार रोहित पवारांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर राळेभात, नगरसेवक मोहन पवार, अमित जाधव, महेश राळेभात, अमोल गिरमे, प्रविण उगले, सावरगावचे सरपंच काका चव्हाण, सतिश चव्हाण, वसिम सय्यद (मंडप), लहू पवार, नितीन यादव, जाकीर सय्यद, ताहेर खान, बलभीम जावळे, मुकुंद डुचे, प्रभाकर सदाफुले, अभिमान खाडे, संतोष लावंड, बाळासाहेब राऊत, इजहार ( पिनू ) खान यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या कालच्या शिवसेना व धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याविषयी विचारले असता ते म्हणाले की, कालचा निवडणूक आयोगाचा निर्णय जनतेला धक्कादायक आहे. पण राजकीय दृष्ट्या अपेक्षित आहे. कारण चंद्रकांत पाटील यांनी याबाबत आगोदरच सुतोवाच केले होते.

निवडणूक आयोगाने जरी चिन्ह गोठवले असले तरी जनतेच्या मनातील शिवसेनेचा आवाज कोणीही गोठवू शकत नाही. असेही पवार यांनी सांगितले.

मातोश्री लाल आखाडा व युवा शक्ती प्रतिष्ठानचे
पै. सुरज पवार, अर्थराज गायकवाड, विजय जाधव, संदीप डोकडे, राजू फुलमाळी, किरण खेत्रे, मनोज इंगळे, सागर खाडे, प्रमोद गायकवाड तसेच इतर सदस्यांनी परिश्रम घेतले आमदार रोहित पवार यांच्या हस्ते महाप्रसाद वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील नागरिकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here