गुरुमाऊली तांबे गटाची एकहाती सत्ता येणार – राज्यनेते श्री. किसनराव वराट

0
364

जामखेड न्युज——

गुरुमाऊली तांबे गटाची एकहाती सत्ता येणार- राज्यनेते श्री. किसनराव वराट

तांबे गटाने बॅकेचा कारभार अत्यंत पारदर्शक व सभासद हिताचे निर्णय घेतले ते मतदार विसरणार नाहीत. मतदार चाणाक्ष आहे, हुशार आहे, मतदाराला कमी समजण्याची चूक करू नये. आज व्हाट्सअप च्या माध्यमातून जे प्रकार चालू आहेत, काही ठराविक लोक मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण कसेही असले तरी आतापर्यंतच्या कालावधीत सर्व मंडळांचा विचार करता सर्वांनी सत्ता उपभोगलेली आहे.

सर्वांचा कार्यकाळ पाहता बापूसाहेब तांबे यांच्या नेतृत्वाखालील गुरुमाऊली मंडळ 2015 ने केलेले कार्य सगळ्यात उत्कृष्ठ आहे. दिलेला डिव्हीडंड, कायम ठेवीवरील व्याज व कर्जावरील कमी केलेल्या व्याजदर या त्रिसूत्रीच्या जोरावर तांबे गटाला एक हाती सत्ता मिळणार आहे असे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य नेते किसनराव वराट म्हणाले.

 

आज जिल्ह्यातील वातावरण पाहता प्रत्येक शिक्षकाची भूमिका गुरुमाऊली मंडळ तांबे गट निवडून देण्याची आहे. कमी केलेल्या व्याजदरामुळे महिन्याला सहा ते सात हजाराचा फायदा प्रत्येक सभासदांना झाला आहे व त्यांनी अनुभवला आहे. मिळालेला डिव्हिडंड 10.10 टक्के समाधानकारक आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्यातून गुरुमाऊली मंडळ 2015 ला बहुमताने आघाडी मिळणार आहे.

 

इतर कोणत्याही मंडळाच्या कार्यकाळात या पद्धतीने कारभार झालेला नाही व अशा पद्धतीने कायम ठेवीचे व्याजदर दिलेला नाही आणि कर्जावरील व्याजदर कमी केलेला नाही.राजकारणात विरोध करणे विरोधकांचे काम आहे परंतु त्यांनी अशा प्रकारे बँकेमध्ये कामकाज अद्याप पर्यंत केलेले नाही. यामुळेच गुरुमाऊली 2015 मध्ये दिवसेंदिवस प्रत्येक तालुक्यातून कार्यकर्ते बिना शर्त प्रवेश करीत आहेत. सभासदांनी आपले हित पाहून गुरुमाऊली मंडळ 2015 ला साथ द्यावी असे आवाहन केले. गुरुकुल बरोबर झालेली स्वराज्य मंडळाची युती ही स्वराज्य मंडळाचे अध्यक्ष श्री सचिन नाबगे यांनी तोडून गुरुमाऊली तांबे गटाला जाहीर पाठिंबा दिला आहे.

तसेच परिवर्तन मंडळाचे नेते श्री राजेंद्र विधाते यांनी सुद्धा गुरुमाऊली तांबे गटाला जाहीर पाठिंबा दिला आहे. तसेच सर्वसामान्य मतदारांचा पाठिंबा ही दिवसेंदिवस वाढत आहे. हे गुरुमाऊली मंडळ, शिक्षक भारती संघटना, एकल शिक्षक मंच व ऐक्य मंडळ यांच्या विजयाचे दयोतक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here