जामखेड न्युज——
राज्यस्तरीय गायन स्पर्धेत डॉ. संजय राऊत प्रथम
जामखेडच्या शिरपेचात मानाचा तुरा
जामखेड येथील डॉ. संजय राऊत यांनी 1 जुलै रोजी डॉक्टर डे निमित्त आयोजित एमपीसीसी फाउंडेशन ओएसएम पुणे स्टुडिओ पुणे आयोजित गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे जामखेडच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. डॉ राऊत यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तसेच विविध ठिकाणी सत्कार होत आहेत.

एमपीसीसी फाउंडेशन ओएसएम पुणेस्टुडिओ पुणे येथे राज्यातील सर्व डॉक्टरांसाठी डॉक्टर डे निमित्त ओपन गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यात संजय राऊत यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.

आगोदर ऑनलाईन अँडिशन झाले होते.
यात सिलेशन अभंग, भावगीत, चित्रपट गीत यातून चाळणी झाली सुमारे साडेसहा सहा हजार गायक सहभागी झाले होते यातून संजय राऊत यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. दुसरा क्रमांक पुणे येथील शेख अझहर यांनी पटकावला

जामखेड येथील डॉ संजय राऊत विजेते तर उपविजेते पुणे येथील शेख अझहर यांनी पटकावला
डॉ. संजय राऊत यांचे जामखेड येथे साईदत्त हाॅस्पीटल आहे. याचे ते संचालक आहेत.

डॉ राऊत हे मराठी साहित्य परिषदेचे सदस्य आहेत. त्यांच्या माध्यमातून कवी संमेलन, गीत गायन हे कार्यक्रम तसेच राज्यस्तरीय कवि संमेलन राबविण्यात येते.
आतापर्यंत नाशिक येथील रेड क्रॉस सोसायटी गीत गायन स्पर्धा यातही बक्षीस पटकावले होते.
उत्तम काव्य सादरीकरण केल्याबद्दल गौरव करण्यात आला होता.
डॉ. संजय राऊत यांना कोरोना काळात केलेल्या भरीव कामामुळे कोरोना यौद्धा पुरस्कार मिळाला आहे आमदार रोहित पवारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता.
तसेच आरोग्य भुषण पुरस्कार २१-२२ न्युज मिडिया गृपतर्फेही पुरस्कार मिळाला आहे.
डॉ. संजय राऊत यांना नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अभिजित कदम यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला आहे.





