सभासद हिताचे निर्णय बापू तांबे यांनी घेतले त्यामुळे सर्वसामान्य मतदार तांबे गटाबरोबर- शरद सुद्रिक

0
224

 

जामखेड न्युज——

सभासद हिताचे निर्णय बापू तांबे यांनी घेतले त्यामुळे सर्वसामान्य मतदार तांबे गटाबरोबर- शरद सुद्रिक!!! 

अहमदनगर जिल्हा शिक्षक बँकेत साडेतीन वर्षे चेअरमन राहून ही ज्यांचे समाधान झालं नाही. ज्यांनी गुरुमाऊली मंडळ फोडण्याचे पाप केलं. त्यांना सभासद कधीच माफ करणार नाही. ” लबाड लांडगा ढोंग करतय लगीन करायचं सोंग करतयं” या वाक्यात बँकेचे माझी चेअरमन शरद भाऊ सुद्रिक यांनी रोहकले गटाचा पर्दाफाश करताना रावसाहेब रोहकलेंचा खरपूस समाचार घेतला.

गुरुमाऊली मंडळ २०१५ बापू तांबे गटाच्या शिक्षक बँक विकास मंडळाच्या प्रचारार्थ बँकेचे माझी चेअरमन शरद भाऊ यांनी काल जामखेड तालुका दौरा केला. उर्दू शाळा येथे जेष्ठ नेते शाकिर शेख यांचा वाढदिवस सर्वांनी मिळून साजरा केला. जामखेड मराठी मुलं, मराठी मराठी मुली त्याचबरोबर उर्दू शाळा, उर्दू मुली, तपनेश्वर, नान्नज, जवळा या ठिकाणी प्रचार करीत असताना ते बोलत होते.

यावेळी पुढे बोलताना शरद भाऊ सुद्रिक म्हणाले की, सर्वसामान्य सभासद बापू तांबे गटाबरोबर आहे. बापूसाहेबांनी बँकेत सभासद हिताच्या योजना राबवल्या बँकेचा व्याजदर बँक स्थापनेपासून आतापर्यंतच्या व्याज दारात सगळ्यात कमी व्याजदर आहे. त्याचबरोबर १०.१० टक्के हा डिव्हीडंट सभासदांना मिळालेला आहे. ठेवीवरचे व्याज आणि कर्जाचे व्याज यातील फरक १.७० आहे. मात्र विरोधी गट सांगताहेत २ टक्के फरकाने कारभार करू. म्हणजे तुमच्या मनात आणखीनही काळ पाप आहे. हे दिसून येत आहे. जामखेड तालुक्यात तांबे गटाला उत्कृष्ट अशी साथ आहे. यामुळे जवळा भागातून गुरूमाऊली मंडळ २०१५ तांबे गटाला नक्कीच भरघोस असं मतदान होईल हा विश्वास आहे.

या ठिकाणी आमचे मंडळाचे विश्वस्त गोकुळ गायकवाड हे दोन सलाईन लावल्यानंतरही प्रचारात स्वतःला झोकून देतात. त्यात सभासदांनी आपल्यासाठी जे प्रेम व्यक्त केले. त्याची उतराई होण्यासाठी खरं गुरुमाऊली मंडळ बापू तांबे गटातच आहे. तेच विजय झाले पाहिजे. तेच सभासदित करू शकतात हा विश्वास देण्यासाठी गोकुळराव स्वतःला सलाईन लावलेले असताना सुद्धा मैदानात उतरले आहे. गुरूमाऊली मंडळ २०१५ तांबे गटाचा कार्यकर्ता निवडणुकीच्या माध्यमातून स्वतःला झुकून देत असेल तर, सोग – ढोंग करणारे किती असोत सर्वसामान्य मतदार अशा ढोंगींना घरी बसल्याशिवाय राहणार नाही. ते जरी घरी बसले तरी त्यांना झोप येणार नाही. ही आम्हाला खात्री आहे पण तरी सांगतो आमची खात्री निवडून येणार छत्री असेही मत शरद भाऊ सुद्रिक यांनी व्यक्त केले.

या प्रचार फेरी दरम्यान संघाचे जामखेड तालुका अध्यक्ष एकनाथ(दादा)चव्हाण बँकेचे उमेदवार संतोषकुमार राऊत, विकास मंडळाचे उमेदवार मुकुंदराज सातपुते, मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग मोहळकर, माजिद शेख, जालिंदर भोगल, दशरथ हजारे, नाना मोरे, राजिव मडके, राजेंद्र हजारे, सुभाष सरोदे, मारूती रोडे, संपूर्ण गुरूमाऊली परिवार सहभागी होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here