जामखेड न्युज——
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या व नायगाव ग्रामपंचायत सदस्या संध्या सोनवणे यांच्या तर्फे नायगाव परिसरातील महिला व विद्यार्थिनींची मोफत आरोग्य तपासणी केली व आरोग्य विषयक मार्गदर्शन केले.

कर्जत जामखेड चे आमदार रोहित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज नायगाव ग्रामपंचायत सदस्य संध्या सोनवणे यांनी पंचक्रोशी महाविद्यालयात विद्यार्थिनींची तसेच महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.शालेय मुलींमध्ये रक्ताचे प्रमाण कमी आढल्याने मुलींनी भविष्यात अनेक शारीरिक तक्रारींना सामोरे जावे लागते.आजाराचे प्रमाण वाढते.

यासाठी विशेषत नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर ह्या तपासण्या केल्या यावरून मुलींना-महिलांना आरोग्यविषयक योग्य ते मार्गदर्शन देखील डॉक्टरांकडून केले जाईल.पोळ साहेबांनी उपस्थित विद्यार्थ्यांनीना मार्गदर्शन केले.

या उपक्रमासाठी तालुक्याचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, सरपंच सुवर्णा उगले, भजनाळे, शाळेचे मुख्याध्यापक साळवी सर, ग्रामसेवक स्वाती पटेकर, युवराज उगले, चंद्रकांत उगले, विनोद उगले, नितीन ससाणे, सचिन उगले, गजानन उगले, महेश सोनवणे, शंकर खैरे उपस्थित होते.




