जामखेड न्युज——
ई -केवायसी प्रलंबित असलेल्या नागरिकांनी शिबीरात ई- केवायसी करून घ्यावी -गटविकास अधिकारी प्रकाश पोळ
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या 8590 लाभार्थ्यांची इ-केवायसी प्रलंबित असून आहे. यापैकी ग्रामसेवकांनी दिलेल्या 30 गावातील 2965 नागरिकांची इ-केवायसी प्रलंबित आहे. प्रलंबित असलेल्या सर्व नागरिकांना सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, केंद्र चालक, रोजगार सेवक यांनी माहिती देऊन तात्काळ इ-केवायसी करून घ्यावी. त्यासाठी ग्रामपंचायत कॅम्प आयोजित करण्यात आले आहेत त्यात प्रलंबित असलेल्या नागरिकांनी ईयूमधून केवायसी करून घ्यावी असे आवाहन गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी केले आहे.

योजनेच्या बाबतीत शनिवारी 30 गावात कॅम्प आयोजित केला जाईल याची नोंद घ्यावी. या कॅम्प साठी सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामसेवक, केंद्र चालक, रोजगार सेवक, स्वच्छाग्रही, ग्रामपंचायतचे कर्मचारी व शिपाई यांनी उपस्थित राहायचे आहे. तसेच आपल्या गावातील प्रलंबित इकेवायसी असलेल्या नागरिकांना तात्काळ निरोप द्यावे. गावात दवंडी द्यावी. लाऊड स्पीकर किंवा घंटागाडीवरून प्रचार प्रसार करावा.

शनिवार, दि. १७/०९/२०२२
कॅम्पची वेळ- सकाळी 8 वा पासून
ठिकाण- गावातील मध्यवर्ती ठिकाण (प्रत्येक गावचे स्वतंत्रपणे कळवले जाईल.)
ज्यांची इ-केवायसी करायची आहे त्यांनी आपले आधार कार्ड व मोबाईल सोबत आणावा. मोबाईल वर OTP येणार असून OTP टाकल्यावरच KYC पूर्ण होईल.

गावनिहाय उपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांचे नियोजन उद्या देण्यात येईल. सर्व व्हाट्सप ग्रुपवर कॅम्प व प्रलंबित यादीचा प्रचार-प्रसार करावा. *सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने एका दिवसात 100% इ-KYC करण्याची संधी आपणाला आहे.*
-गटविकास अधिकारी, जामखेड.
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या 8590 लाभार्थ्यांची इ-केवायसी प्रलंबित असून आहे. यापैकी ग्रामसेवकांनी दिलेल्या 30 गावातील 2965 नागरिकांची इ-केवायसी प्रलंबित आहे. प्रलंबित असलेल्या सर्व नागरिकांना सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, केंद्र चालक, रोजगार सेवक यांनी माहिती देऊन तात्काळ इ-केवायसी करून घ्यावी. त्यासाठी ग्रामपंचायत कॅम्प आयोजित करावे. सदर यादीचा जास्तीत जास्त प्रचार-प्रसार करावा. जर इ-केवायसी झाली नाही तर 6000 रु इथून पुढे मिळणार नाहीत व आपले नाव योजनेतून कायमस्वरूपी वगळले जाईल याची नोंद घ्यावी.
असे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी सांगितले आहे.




