जामखेड न्युज—–
पोळा हा सण शेतकरी, कष्टकऱ्यांचा सण म्हणून ओळखला जातो. शेतशिवारात राबणाऱ्या सर्जा राजाच्या जोडीच्या उत्सवाचा हा सण आहे. बैल रंगवतात पण यंदा त्यात राजकीय घडामोडीच्या आणि शेतकऱ्यांच्या वेदना मांडणाऱ्या सजावटी केल्या होत्या. ५० खोके एकदम ओके या घोषणावरून विधिमंडळाच्या पायऱ्यावर गदारोळ झाला. आता ग्रामीण भागातील पोळा सणाला खोक्यांच्या राजकीय रंग सजला आहे. बैलाच पाठीवर वेगवेगळ्या राजकीय कमेंट सजवण्यात आल्या होत्या.

खाेके रे खोके…पन्नास खोके
गोहाटी गोव्यावरून, धावत आले हो बोके…
त्या बोक्याले, ईडीचा धाक…
मांजर झाले हो, उद्धवचे वाघ…
एक नमन गौरा पार्वती हरबोला हर हर महादेव

जामखेड तालुक्यातील बावी गावात सरपंच निलेश पवार सह ग्रामस्थांनी पुढील प्रमाणे सजावटी केल्या होत्या
ईडी सरकार,
गद्दार सरकार,
दमदार आमदार रोहित पवार,
दमदार सरपंच निलेश पवार
अशी सजावट केलेली होती यावेळी गावातील गौतम पवार ,दिपक पवार ,अंगद कारंडे, अशोक पवार, योगेश पवार, मारूती पवार, दिपक पवार, सलमान पठाण, गौरव भिसे, मोइज पठान आदी मान्यवर उपस्थित होते.


शेतकऱ्यांच्या वेदना मांडणाऱ्या सजावटीनी त्यात भर घातली आहे. गोवाहटीच्या राजकारणाचे पडसाद या झडत्यात उमटले आहे. ओल्या दुष्काळाचे चित्र स्पष्ट करणाऱ्या काही सजावटी ही यावर्षीच्या पोळा उत्सवात लक्षवेधक ठरत आहेत.

शेतकरी राजा, त्यांची व्यथा आणि बेजार झालेले शेतशिवार, शेतशिवाराच्या नावावर रंगणारा कलगीतुरा सजावटी रूपात गावशिवारात पाहायला मिळत आहे. यामुळे मनोरंजनासोबत प्रबोधन आणि शेतकऱ्यांचे प्रश्नही पोळा सणाच्या तोरणाखाली दिसणार आहे.




