जामखेड न्युज—–
कारल्यासारखा दिसणारा कर्टुल्याचे आरोग्यासाठी असंख्य फायदे आहेत. अनेकजण याला ‘काकोरा’ या नावानेही ओळखतात. पावसाळ्यात कर्टुल्याची भाजी खाल्ल्याने संसर्गाचा धोका कमी होतो. त्याचे आरोग्याशी संबंधित इतर फायदे काय आहेत, चला जाणून घेऊया.

पावसाळ्यात मिळणारी ही काटेरी भाजी म्हणजे डायबिटीस अन् ब्लड प्रेशरवर रामबाण
चांगल्या आरोग्यासाठी उत्तम अन्नाची शिफारस केली जाते. त्यात भाज्यांचे नाव सर्वात वर येते. भाज्यांमध्ये भरपूर पोषक तत्व असतात, जे शरीरातील पौष्टिकतेची कमतरता पूर्ण करून आजारांपासून दूर राहण्यास मदत करतात.

कर्टुला ही भाजी ही देखील अशाच फायदेशीर भाज्यांपैकी एक आहे. ज्याच्या सेवनाने रोग तर बरे होतातच, पण रामबाण उपायासारखे कामही होते. या भाजीला कंटोला, कंटोळी किंवा कर्टुला म्हणतात. कर्टुलाला आयुर्वेदिक औषध असेही म्हणतात. कारल्यासारखा दिसणारा कर्टुल्याचे आरोग्यासाठी असंख्य फायदे आहेत. अनेकजण याला ‘काकोरा’ या नावानेही ओळखतात. पावसाळ्यात कर्टुल्याची भाजी खाल्ल्याने संसर्गाचा धोका कमी होतो. त्याचे आरोग्याशी संबंधित इतर फायदे काय आहेत, चला जाणून घेऊया.


वजन करते नियंत्रितNetmeds.com च्या मते, जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल. तर कर्टुल्याची भाजी तुम्हाला यामध्ये चांगली मदत करू शकते. यामध्ये कॅलरी खूप कमी आणि फायबर जास्त असल्याने भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणात राहते.
रक्तदाब नियंत्रित होतो. कर्टुल्याची भाजी रक्तदाबाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर ठरते. कर्टुल्याच्या रसाचा आहारात समावेश केला तरी रक्तदाब नियंत्रणात राहू शकतो.

कर्करोगापासून संरक्षण कर्टुल्यामध्ये ल्युटीन आढळते, ज्याच्या मदतीने हृदयाच्या समस्यांसह कर्करोगदेखील टाळता येतो. हे व्हिटॅमिन सी चा एक चांगला स्त्रोत आहे, जो शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकतो. यामुळे कर्करोग होण्याचा धोका बर्याच प्रमाणात कमी होतो.
हंगामी फ्लू प्रतिबंध कर्टुल्याची भाजी पावसाळ्यात संक्रमण आणि मौसमी फ्लूपासून संरक्षण करण्यासदेखील मदत करू शकते. याच्या सेवनाने सर्दी, खोकला, घसा खवखवणे अशा समस्या उद्भवत नाहीत.
मधुमेह नियंत्रित होतो.कर्टुल्याच्या भाजीने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. पाण्यासोबतच यामध्ये फायबरचे प्रमाणही जास्त असते, त्यामुळे मधुमेह नियंत्रणात राहतो. कर्टुला भाजीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. याच्या सेवनाने मुरुमे, रोगप्रतिकारशक्ती, पचनाशी संबंधित समस्यांवरही मात करता येते.




