स्वतंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्ताने जामखेड नगरपरिषद कडुन विविध कार्यक्रमांचे आयोजन -मिनिनाथ दंडवते

0
306
जामखेड प्रतिनिधी 
           जामखेड न्युज——
   आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाले आहेत यामुळे यंदा देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने हर घर तिरंगा या संकल्पनेतून जामखेड नगरपरिषदेच्या वतीने देखील शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे आशी माहिती मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी दिली आहे. 
भारतीय स्वातंत्र्याला यंदा 75 वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मनात स्वातंत्र्याच्या आठवणी उजळून निघाव्यात तसेच स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात यासाठी यंदा देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने हर घर तिरंगा या संकल्पनेतून जामखेड नगरपरिषदेच्या वतीने देखील शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आशी माहिती मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी दिली आहे.
जामखेड नगरपरिषद कडुन दि ९ अॉगस्ट पासुन ते १५ अॉगस्ट पर्यंत सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या मध्ये जामखेड नगरपरिषद मध्ये विषेश सभेचे आयोजन करुन आजादी का अमृत महोत्सव या विषयावर चर्चा व स्वराज्य महोत्सव तसेच हरघर झेंडा उपक्रमची माहिती देण्यात आली.
शालेय विद्यार्थींसाठी चित्रकला व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. वृक्ष लागवड करण्यासाठी रोपे खरेदी करण्यात आले आहेत. तसेच चित्र रथ तयार करुन या द्वारे जनजागृती करण्यात आली. सध्या सोशल मिडीया चा जमाना आसल्याने त्या द्वारे प्रत्येक नागरीकांन पर्यंत पोहचवण्यासाठी प्रचार प्रसिद्ध करण्यात आली. स्वातंत्र्याच्या आमृत महोत्सवाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थींनी नगरपरिषदेच्या माध्यमातून पर्यावरण शपत व संविधान शपथ घेतली तसेच जामखेड शहरात स्वच्छता मोहीम देखील राबविण्यात आली. नुकतीच शालेय विद्यार्थीं, शिक्षक, प्रशासकीय कार्यालयांचे आधकधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत जामखेड शहरातुन प्रचार रॅली काढण्यात आली होती. 
 
१३  ते १५ ऑगस्ट या कालावधीत आपल्या घरावर तिरंगा फडकवा असे आवाहन करण्यात आले आहे. 
यावर्षी आपण सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे, त्यासाठी ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला पाठबळ देऊया. 13  ते 15 ऑगस्ट या कालावधीत आपल्या घरावर तिरंगा फडकवा किंवा तुमच्या घरांमध्ये तिरंगा लावा. या मोहिमेमुळे आपले राष्ट्रीय ध्वजाशी असलेले ऋणानुबंध अधिक दृढ होतील असे मत जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी व्यक्त केले आहे. तसेच पुढे सतरा तारखेपर्यंत आजादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात येणार आहे आशीही माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here