माजी सैनिकांना उपयोग रात्रीच्या गस्तीसाठी करून घेणार – पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड

0
222
जामखेड प्रतिनिधी
 सैन्यात काम करताना अंगी असलेली शिस्त, देशप्रेम व समाजहिताची भावना या सर्वांचा वापर करून सेवानिवृत्त सैनिकांचा रात्रीच्या गस्तीसाठी उपयोग करून
चोरांचा बंदोबस्त करून शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवणार आहे असे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी सांगितले.
       दिनांक २४ रोजी माजी सैनिकांची समन्वय मिटिंग घेण्यात आली. मिटिंग मध्ये माजी सैनिक यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यात आल्या त्या अडचणी आम्ही प्राधान्याने लक्ष देऊन सोडवू असे सांगितले तसेच आम्हास रात्र गस्त करीता तुमचे  सहकार्य लागेल असे सांगताच त्यांनीही पोलीस प्रशासनास रात्र गस्त करीता  आम्ही कधीही उपलब्ध होऊ असे आश्वासन दिले.
       माजी सैनिक शहाजी ढेपे यांनी सांगितले की,
1) बाजारतळ जामखेड येथे हुतात्मास्मारक आहे त्याचे बाजूने अतिक्रमण झाले आहे ते अतिक्रमण काढून टाकावे यासाठी आम्ही नगरपरिषद यांना कळवले आहे तरी आपले स्तरावरून  तात्काळ हालचाली कराव्यात.
2)तसेच माजी सैनिक यांचे साठी तालुका पातळीवर तहसील कार्यालय यांचेकडून एक ऑफिस मिळावे जेणेकरून आम्हाला स्वतः चे काही प्रश्न मांडण्यासाठी एकत्र येता येईल.
  या मागणीविषयी गायकवाड यांनी सांगितले की,
 तहसीलदार व मुख्याधिकारी यांना तुमच्या अडचणी सांगून त्यावर तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी मदत करेल अशी ग्वाही दिली.
बजरंग डोके माजी सैनिक संघटना अध्यक्ष यांनी यावेळी सांगितले की तालुक्यात माजी सैनिक यांची मिटिंग घेणारे पहिलेच अधिकारी आम्हाला तालुक्यात पोलीस निरीक्षक म्हणून भेटले आहेत आता आमचे  व अनेक गरिबांचे  प्रश्न सुटणार आहेत.अशी आशा व्यक्त केली आहे.
या मिटिंग करिता ३० ते ३५ माजी सैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here