जामखेड न्युज——
मुळचे खर्डा ता. जामखेड येथील व सध्या मुंढवा पोलीस स्टेशन पुणे येथे कार्यरत असलेले सहायक पोलीस निरीक्षक संदीप जोरे यांना उत्कृष्ट कामगिरबद्दल बहिर्जी नाईक हा पुरस्कार पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला.त्याबद्दल खर्डा येथील ग्रामस्थ,व्यापारी,पत्रकार बंधू व राजकीय क्षेत्रातील अनेक कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा करत त्यांचे अभिनंदन केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,समर्थ पोलीस स्टेशन पुणे येथील गुन्हा रजिस्टरला पुण्यातील एका टोळीतील आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल होता. परंतु वेग वेगळ्या तुकड्या तैनात करण्यात करूनही आरोपीचा सुगावा लागत नव्हता तेव्हा तपासाचे हे आव्हान स्वीकारून सपो निरीक्षक संदीप जोरे यांनी शिताफीने वेषांतर करून आरोपीला पकडले होते.

तसेच खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना ही चार तासांच्या आत पकडुन अटक केली होती .त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरी बद्दल त्यांना पोलीस प्रशासना चे वतीने बहिर्जी नाईक हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

संदीप जोरे हे खर्डा येथील रहिवाशी असून येथील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब जोरे यांचे ते चिरंजीव आहेत.खर्डा येथील भाजपाचे कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख रवी सुरवसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विजयसिंह गोलेकर, वैजिनाथ पाटील, मदन गोलेकर, सेवा संस्थेचे चेअरमन प्रकाश गोलेकर, सरपंच आसाराम गोपाळघरे, पत्रकार दतराज पवार, संतोष थोरात, तुळशीदास गोपाळघरे, अनिल धोत्रे, किशोर दुशी बाळासाहेब शिंदे, गणेश जव्हेरी आदींनी अभिनंदन केले आहे.




