जामखेड न्युज——
नव्या सरकारकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. उद्या भाजप सत्ता स्थापनेचा दावा करेल. त्यानंतर 1 जून रोजी फडणवीस-शिंदे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
नव्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री असणार असल्याचं सांगितलं जात आहे.

तसेच फडणवीस सरकारमध्ये शिवसेनेतील सर्व बंडखोर आठ आमदारांना मंत्रीपद दिलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. भाजपच्या (bjp) कमी लोकांना या मंत्रिमंडळात स्थान मिळेल असंही सांगितलं जात आहे

महामंडळांवरही शिंदे समर्थकांना अधिक संधी दिली जाणार आहे. शिंदे समर्थक नाराज होऊन शिवसेनेत जाऊ नये म्हणून हा निर्णय घेतला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
शिंदे यांच्याबरोबर भाजपचा सत्तेचा फॉर्म्युला ठरला असल्याचं सांगितलं जात आहे. त्यानुसार भाजपकडे 29 मंत्री असतील. तर शिंदे गटाला 13 मंत्रिपदे देण्यात येणार आहेत.
त्यात 8 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्रिपदांचा समावेश आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून कुणा कुणाला मंत्रिपदे मिळतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
भाजपचे संभाव्य मंत्री
देवेंद्र फडणवीस
चंद्रकांत पाटील
सुधीर मुनंगटीवार
प्रवीण दरेकर
गिरीश महाजन
आशिष शेलार
गोपीचंद पडळकर
चंद्रशेखर बावनकुळे
राम शिंदे
नितेश राणे
शिंदे समर्थक संभाव्य मंत्री
एकनाथ शिंदे
दीपक केसरकर
उदय सामंत
दादा भुसे
संदीपान भुमरे
गुलाबराव पाटील
बच्चू कडू
संजय राठोड
अब्दुल सत्तार
शंभुराज देसाई
प्रताप सरनाईक









