Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या सरकारी कामात कामात अडथळा निर्माण करणार्‍या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर जामखेड पोलिस...

सरकारी कामात कामात अडथळा निर्माण करणार्‍या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल एका आरोपीला अटक

0
356

जामखेड न्युज – – – 

   जामखेड नगर रोडवरील चिंचपुर सरहद्दीवर चोरटी वाहतूक करणारा टिपर घेऊन जात असताना महसुल पथकाने अडवण्याचा प्रयत्न केला असता पथकाच्या वाहनाला वाळू तस्कराने चार चाकी गाडी आडवी लावल्याने वाळू वाहतूक करणारा टिपर पसार झाला या प्रकरणी कामगार तलाठी यांनी जामखेड पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अज्ञान हैवा टिपर व चार चाकी वाहनाच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामखेड पोलीसांनी एका आरोपीला अटक केली आहे. 

ADVERTISEMENT

      पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी राजुरी येथिल तलाठी सचिन किसन खिळे हे दिनांक २३ रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास जामखेड नगर रोडवरील चिंचपूर सरहद्दीजवळ एका हाॅटेल समोर गस्त घालत असताना या रोडवर वाळू वाहतूक करणारा हैवा टिपर क्रमांक एम. एच. १६ सी. डी ४१०१ हा चोरटी वाळू घेऊन जात होता यावेळी सदरच्या हैवा टिपर ला फिर्यादी व साक्षीदार यांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला यावेळी टिपर चालक टिपर सह पळून जात असताना सदर टिपरचा पाठलाग महसूल विभाग करत आसताना दुसर्‍या आरोपी चारचाकी वाहन चालकाने त्यांची चारचाकी फिर्यादीच्या वाहनास आडवी लावून अडथळा निर्माण केला त्यामुळे सदर अवैध वाळू वाहतूक करणारा टिपर पळून गेला. 

               ADVERTISEMENT 

     या प्रकरणी टिपर पळून लावण्याचा प्रयत्न करून सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी हैवा टिपर व चारचाकी चालक ( नाव माहीत नाही) यांच्या विरोधात जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात हे करत आहेत. पोलीसांनी हैवा टिपर व चारचाकी असे दोन्ही वाहने जप्त केली आहेत. या प्रकरणी जामखेड पोलीसांनी पांडुरंग लक्ष्मण खर्डे या आरोपाला अटक केली आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!