Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या शिवसेना बंडखोर आमदारांचा दैनंदिन अंदाजे खर्च ८ लाख रुपये भाजपा खर्च करत...

शिवसेना बंडखोर आमदारांचा दैनंदिन अंदाजे खर्च ८ लाख रुपये भाजपा खर्च करत असल्याचा शिवसेनेचा आरोप

0
217
जामखेड न्युज – – – – 
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट आसाममधील गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हाॉटेलमध्ये थांबले आहेत. गेल्या सहा दिवसांपासून हे सगळे बंडखोर आमदार या हॉटेलमध्ये वास्वव्यास आहे. या आमदारांचा एका दिवसाचा खर्च ८ लाख रुपये आहे. भाजपा हा खर्च करत असल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. मात्र, आसामचे मुख्यमंत्री भाजपा नेते हिमंता बिस्वा सरमा यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
                           ADVERTISEMENT
भाजपा किंवा आसाम सरकार या बंडखोर आमदारांच्या हॉटेलचे बील देत नसल्याचा दावा सरमा यांनी केला आहे. जर कोणी पाहुणे आसामला आले तर त्यांची गैरसोय होणार नाही किंवा ते सुरक्षित रहावेत यासाठी माझे प्रयत्न असतात. उद्या काँग्रेस किंवा इतर पक्ष आसाममध्ये आले, तर मी अशाच पद्धतीने त्यांचे स्वागत करेन असं सरमा म्हणाले. भाजपा किंवा आसाम सरकार हॉटेलचे बील का देईल? उलट आसामला हॉटेलकडून जीएसटीतून उत्पन्न मिळते. मी शिवसेनेचे आभार मानतो. त्यांच्यामुळे आसाममधील पूराची चर्चा केली जात असल्याचे सरमा म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!