Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या आमदार रोहित पवारांच्या पाठपुराव्यामुळे देवस्थानाच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी चौंडी साठी सात कोटी...

आमदार रोहित पवारांच्या पाठपुराव्यामुळे देवस्थानाच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी चौंडी साठी सात कोटी मंजूर

0
221

जामखेड न्युज – – – – 

 

चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमादरम्यान येथील विविध प्रलंबित असलेली विकास कामे लवकरात लवकर मार्गी लावली जातील, असा शब्द आमदार रोहित पवार यांनी जनतेला दिला होता. त्यानंतर त्यांनी अहिल्यादेवी होळकर जन्मस्थळी 4 कोटींचा घाट मंजुर करून आणत त्याचे काम देखिल सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळ विकासासाठी शासनातर्फे आता अतिरिक्त 7 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर यांचे संग्रहालय बांधणे, जन्मस्थळी असलेल्या सीना नदीच्या घाटाचे काम व सुशोभीकरण करण्याचे काम यासोबतच चौंडीला 2 नवीन भव्य कमान उभारण्याचे काम या निधीच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत. *शासन निर्णय क्रमांक विकास-2022/प्र. क्र.50/भाग-3/योजना-6* यानुसार संबंधित आदेश देण्यात आले आहेत.

ADVERTISEMENT

 

मतदारसंघात असलेल्या देवस्थानांच्या विकासासाठीही शासनाकडून भरघोस निधी मंजूर करून आणण्यात आ. रोहीत पवारांना यश आले आहे. ज्यामध्ये पुढील प्रमाणे देवस्थानांचा समावेश आहे –

*1. खंडोबा मंदिर, देवदैठण- घाट बांधकाम व सुशोभीकरण 35 लाख*
*2. नंदादेवी मंदिर, नान्नज – सभामंडप बांधकाम – 25 लाख*
*3. कोरेश्वर मंदिर, कोरेगाव – दगडी सभामंडप बांधकाम – 25 लाख*
*4. जगदंबा देवी मंदिर, राशीन – सुशोभिकरण व विद्युतीकरण – 30 लाख*
*5. लालगिर स्वामी मंदिर, मांदळी – सभामंडप व स्वयंपाक खोली बांधकाम – 50 लाख रुपये*

या व्यतिरिक्त मतदारसंघातील 2515 अंतर्गत येणाऱ्या इतर विविध विकास कामांसाठी राज्य सरकारकडून मतदारसंघातील गावांना 10 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

मतदारसंघाच्या विकासकामांसाठी पुढाकार घेऊन शासनाकडे वेळोवेळी आवश्यक तो पाठपुरावा करून सर्व अडचणी सोडवण्यासाठी आ. रोहीत पवार प्रयत्नशील आहेतच शिवाय वारंवार मतदारसंघात विविध योजनांच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी मंजूर करून आणत ते मतदारसंघातील सर्व अडचणी दूर करण्यासाठीही सतत झटत आहेत. कर्जत व जामखेडमधील प्रलंबित असलेली अनेक विकास कामे गेल्या 2 वर्षात आ. रोहीत पवार यांच्या माध्यमातून मार्गी लागत असल्याचे वेळोवेळी पाहायला मिळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!