मातृदिनानिमित्त खास

0
221
जामखेड न्युज – – – – – 
‘आई’ या दोन शब्दांभोवती आपले संपूर्ण विश्व फिरत असते. बाहेरून घरात आल्यावर आपल्या नजरा ज्या व्यक्तीला शोधत असतात ती व्यक्ती म्हणजे ‘आई’. आपल्याला होणाऱ्या वेदना, आनंद या सर्वाची चाहूल तीला आधीच झालेली असते. दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी ‘मदर्स डे’ साजरा केला जातो. या वर्षी ‘मदर्स डे’ ८ मे रोजी साजरा होणार आहे. या लेखामध्ये ‘मदर्स डे’ आपण कसा सजरा करू शकतो किंवा आईला काय गिफ्ट देऊ शकतो याचा विचार करा
‘सबसे बडी योद्धा माँ होती हैं !’ KGF मधल्या रॉकीचा हा डायलॉग ऐकल्यानंतर आई काय करु शकते याची हलकिशी जाणीव आपल्याला होऊन जाते. ‘आई’ या दोन शब्दांभोवती आपले संपूर्ण विश्व फिरत असते. बाहेरून घरात आल्यावर आपल्या नजरा ज्या व्यक्तीला शोधत असतात ती व्यक्ती म्हणजे ‘आई’. आपल्याला होणाऱ्या वेदना, आनंद या सर्वाची चाहूल तीला आधीच झालेली असते. आपली मूड खराब असल्यावर ती तीच्या संपू्र्ण ताकतीने आपल्या खूश करणारी ती एकमेव व्यक्ती.
इतरवेळी काळाच्या सोबत चालणारी आपली आई आपण आजारी पडल्यावर नजर काढायलाही मागेपुढे पाहत नाही. लहानपणी आपली बेस्ट फ्रेंन्ड असणाऱ्या आईला पुढे कामाच्या गडबडीत आपण विसरुनच जातो. आपली मुलं मोबईलवर जास्त वेळ मित्रांसोबत बोलत असतात म्हणून व्हॉटसअ‍ॅप शिकणारी आपली आई आपल्या प्रेमासाठी काहीह करु शकते.
दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी ‘मदर्स डे’ साजरा केला जातो. यावर्षी ८ मे रोजी ‘मदर्स डे’ म्हणजेच मातृदिन साजरा (Mothers Day Gift Idea) केला जात आहे. प्रत्येकजण या दिवसाची वाट पाहत असतो. हा दिवस केवळ आईना समर्पित नाही तर आपली आई आपल्यासाठी किती अनमोल आहे याची जाणीव करून देतो. अशा परिस्थितीत या दिवस तुम्ही आईला खास गिफ्ट देऊ शकता याची माहिती घेऊयात.
​आईला पार्लरमध्ये घेऊन जा
घरातील कामाच्या गडबडीमध्ये आई एवढी गुंतून जाते की स्वत: कडे लक्षच देत नाही.अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या आईला घेऊन ब्युटी पार्लर किंवा शॉपिंगला घेऊन जाऊ शकता. यामुळे तुम्ही तिच्या सोबत थोडावेळ देखील व्यतीत करु शकता. आईसोबतचे तुमचे नाते अजूनच घट्ट होण्यास मदत होईल. तुमचा मी टाईम ( Me Time) देखील तुम्हाला मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here