आमदार रोहित पवारांमुळे राज्यात एक माॅडेल मतदारसंघ म्हणून कर्जत-जामखेडची वेगळी ओळख – नामदार राजेश टोपे

0
291
जामखेड न्युज – – – – – 
आमदार रोहित पवार हे मतदारसंघातील विकास कामांसाठी झपाटल्यासारखे काम करत आहेत त्यामुळेच कर्जत-जामखेडची ओळख एक माॅडेल मतदारसंघ म्हणून होईल रोहित पर्व म्हणून राज्यात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशा लीडरला मतदारसंघाने जपले पाहिजे असे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले.

आज सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण महाराष्ट्र शासन,यांच्या सहकार्यातून कर्तव्यदक्ष आमदार रोहित दादा पवार यांच्या संकल्पनेतून जामखेड येथे 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचा भूमिपूजन समारंभ महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री नामदार राजेश टोपे यांच्या हस्ते व कर्तव्यदक्ष आमदार रोहित दादा पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय घोगरे, उप संचालक आरोग्य सेवा नाशिक मंडळ नाशिक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदिप सांगळे,  डॉ. भास्कर मोरे,

प्रांताधिकारी अजित थोरबोले, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, कर्जत-जामखेड विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर राळेभात, राजेंद्र कोठारी, दत्ता वारे, सूर्यकांत मोरे, रमेश आजबे, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी,संजय वराट, हनुमंत पाटील, मंगेश आजबे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय वाघ, डॉ. भरत देवकर. सुरेश भोसले, राजेंद्र पवार, काका कोल्हे, निंबाळकर  यांच्या सह सर्व अधिकारी पदाधिकारी आशा सेविका सर्व वैद्यकीय कर्मचारी,नागरिक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
    यावेळी बोलताना राजेश टोपे म्हणाले की, या अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालया मुळे जामखेड तालुक्यातील सर्व सामान्य जनतेला मोठा फायदा होणार आहे. खाजगी दवाखान्यात होणारे सर्व अत्याधुनिक उपचार आता जामखेड मध्ये शक्य होणार आहेत.सुसज्ज आयसी यु असेल, सीटी स्कॅन असेल, एम आर आय,सोनोग्राफी तसेच कर्मचाऱ्यंसाठी अत्याधुनिक निवास उपलब्ध होणार आहेत.
   पुढे बोलताना टोपे म्हणाले की, आपण आजारीच पडू नये म्हणून गावा गावात योगा शिबीराचे आयोजन केले पाहिजे तसेच आपला आहार विहार योग्य हवा.
  जामखेड उपजिल्हा रुग्णालयाची जशी भव्य दिव्य तीन मजली आयकॉन इमारत असेल तसेच इमारतीप्रमाणे आरोग्य सेवाही उत्तम राहील. आतापर्यंत जामखेडचा सरकारी दवाखाना म्हणजे रेफर हाॅस्पिटल अशी होती आता ती पुसून सर्व उपचार येथेच होणार आहेत..
यावेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालय कामाची मुदत दोन वर्षे असली तरी एका वर्षात काम पुर्ण होईल त्यामुळे परिसरातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळतील. कर्जत-जामखेड मतदारसंघ एक माॅडेल मतदारसंघ होत आहेत मतदारसंघात फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून अनेकांना आरोग्य सेवा मिळाल्या ही सेवा कायमस्वरूपी सुरू राहणार आहे. ऐंशी हजारापेक्षा जास्त लोकांना याचा फायदा झाला आहे.
    यावेळी बोलताना डॉ. भारस्कर मोरे म्हणाले की, देशातील आरोग्य मंत्र्यांची कामगिरी पाहता देशात सर्वात चांगले काम राजेश टोपे यांचे आहे. तसेच आमदार रोहित पवारांच्या पाठपुराव्यामुळे मतदारसंघातून चार राष्ट्रीय महामार्ग जात आहेत. आमदार रोहित पवारांनी आपल्या कामांच्या माध्यमातून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. महात्मा फुले जीवनदायी योजनेत आयुष  समावेश करावा अशी मागणी केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here