अतिरिक्त निधीसह मतदारसंघात सुरू असलेल्या 66.68 कोटी रुपयांच्या  तुकाई उपसा सिंचन योजनेच्या कामाची रोहित पवारांकडून पाहणी!

0
252
जामखेड न्युज – – – – 
 मतदारसंघात असलेल्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार शासन स्तरावर वेळोवेळी पाठपुरावा करत असल्याचे पाहायला मिळत असते. त्यातच तुकाई उपसा सिंचन योजनेमार्फत कर्जत तालुक्यातील अवर्षण प्रवण क्षेत्रातील 3 लघु पाटबंधारे प्रकल्प आणि 24 पाझर तलाव, कुकडी कालव्यामधून पाणी उपसा करून बंदिस्त नलिका प्रणालीद्वारे भरून देण्याचे प्रयोजन पूर्वी करण्यात आले होते.  पूर्वी तुकाई उपसा सिंचन या योजनेसाठी 17 गावे आणि 24 तलावांना परवानगी होती. परंतु आमदार रोहित पवार यांनी शासनस्तरावर प्रयत्न करून आणखी 2 गावे व 3 तलावांचा यात समावेश करून घेतला. त्यानंतर आता सुधारित 19 गावे आणि 27 तलावांचे काम मतदारसंघात  सुरू आहे. मागच्या काळात अनेक परवानग्या व अनेक विषय मार्गी लावायचे राहिले होते ते देखील आता टप्प्याटप्प्याने आमदार रोहित पवारांच्या प्रयत्नातून मार्गी लागत आहे. कर्जत तालुक्यातील एकूण 19 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न सोडवण्यास या योजनेच्या माध्यमातून मदत होणार आहे.
या योजनेसाठी राज्य सरकारने 61.03 कोटी रुपये यापूर्वी मंजूर केले होते. त्यानंतर आमदार रोहित दादा पवार यांच्या पाठपुराव्यानंतर अतिरिक्त 5.65 कोटी रुपये राज्य शासनाने मंजूर केले आहेत. त्यानुसार आता तुकाई उपसा सिंचन योजनेसाठी सुधारित 66.68 कोटी रुपयांच्या कामास शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. तसेच हे काम मतदारसंघात प्रगतीपथावर आहे. यापूर्वी यासंबंधी अनेक बैठका झाल्या आहेत आणि त्यातून जे प्रलंबित वना संदर्भातील प्रश्न होते. ते काही प्रमाणात सुटले आहेत आणि राहिलेले लवकरच सुटतील. यावेळी शेतकऱ्यांच्या व अधिकाऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन लोकांमध्ये बसून चर्चा झाल्यानंतर ज्या त्रुटी राहिल्या असतील त्या लवकरच मार्गी लावल्या जातील, असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.
या कामाची पाहणी रविवारी आमदार रोहित पवार यांनी केली व कामात येत असलेल्या अडचणी व त्यावर योग्य ती पावले उचलण्याच्या सुचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. तुकाई उपसा सिंचन योजनेमध्ये जास्तीत जास्त गावांचा समावेश व्हावा यासाठी आमदार रोहित पवार हे प्रयत्नशील होते. अशातच अतिरिक्त गावांचा समावेश करण्यात आणि या योजनेसाठी अतिरिक्त निधी मंजूर करून आणण्यात रोहित पवारांना यश आल्याचे पाहायला मिळत आहे. यावर्षी 10 कोटींपेक्षा अधिक निधी काम लवकर पूर्ण करण्यासाठी  वितरित करण्यात आला आहे. या कामाची पाहणी करत असताना कामाचा दर्जा आणि गुणवत्ता रोहितदादांनी तपासला आणि येत्या 3 महिन्यात काम पूर्णत्वास नेण्याचा दृष्टीने नियोजन करण्याच्या सुचना अधिकारी व कर्मचाऱ्यांना केल्या. सध्या सोलारचा आणि भूसंपादनाचा राहिलेले विषय पण लवकरच मार्गी लागतील. प्रश्न मार्गी लागला असून  या पाहणी वेळी मृद व जलसंधारण विभागाचे श्री.राजेंद्र काळे साहेब, मनोजकुमार ढोकचौळे साहेब, ठुबे साहेब व वन विभागाचे अधिकारी सागर केदार साहेब तसेच स्थानिक ग्रामस्थ आणि पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here