जामखेड प्रतिनिधी
सणासुदीच्या काळात जर काही अफवा पसरवत असेल तर त्यांची गय केली जाणार नाही अफवा पसरवणाऱ्यांवर
कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस उपविभागीय अधिकारी आण्णासाहेब जाधव यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत दिला.
जामखेडमध्ये तहसील कार्यालयात शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी डीवायएसपी आण्णासाहेब जाधव बोलत होते. यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे, नायब तहसीलदार मनोज भोसेकर, पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, प्रा. मधुकर राळेभात, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे, मुक्तार सय्यद, अझहर काझी सह मोठ्या संख्येने मुस्लीम कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आण्णासाहेब जाधव म्हणाले की,
मुस्लिम बांधवांसाठी पवित्र असलेल्या रमजान ईद च्या पार्श्वभूमीवर समाजात सामाजिक सलोखा व राष्ट्रीय एकात्मता पाळली पाहिजे. समाजात जर कोणी अफवा पसरवत असेल तर आमच्या पोलीस दलाच्या सायबर सेलचे त्यावर बारकाईने लक्ष आहे. अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. सर्व नागरिकांना शांततेचे आवाहन केले.
प्रतिनिधी नासीर पठाण सह कॅमेरामन अशोक वीर जामखेड