जामखेड सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी अंकुश कोल्हे तर उपाध्यक्षपदी बाबासाहेब शेळके यांची बिनविरोध निवड

0
202
जामखेड न्युज – – – – 
   आज दिनांक ८ एप्रिल २०२२ रोजी जामखेड सोसायटीच्या कार्यालयामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी श्री. देविदास घोडेचोर व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री. दिपक नेटके यांच्या उपस्थितीमध्ये जामखेड विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन व व्हा.चेअरमन पदाची निवड प्रक्रिया पार पडली.
         यावेळी सर्व १३ संचालकाच्या उपस्थितीत चेअरमनपदासाठी अंकुश रंगनाथ कोल्हे तर व्हा.चेअरमन पदासाठी बाबासाहेब नानासाहेब शेळके यांचा अर्ज दाखल झाल्याने त्यांची अविरोध निवड करण्यात आली.
    जामखेड शहरातील व तालुक्यातील जामखेड सोसायटीच्या निवडणूकीत मोठ्या मताधिक्याने विजयी झालेल्या संस्थेवर गेल्या २६ वर्षापासून सहकारमहर्षी जगन्नाथ तात्या राळेभात यांची एकहाती सत्ता आहे. जामखेड संस्थेची वाटचाल सतत प्रगतीकडे असून संस्था कायम नफ्यात आहे.
     यावेळी नवनिर्वाचित चेअरमन, व्हा.चेअरमन, निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांचा जिल्हा बँकेचे संचालक मा.श्री.अमोलजी राळेभात साहेब व मार्केट कमेटीचे माजी सभापती सुधीर (दादा) राळेभात यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
   लोकप्रिय आमदार मा.रोहित दादा पवार यांच्या नेतृत्वाने जामखेड संस्थेची चेअरमन, व्हा.चेअरमनपदाची निवड बिनविरोध करण्यात आली व नवनिर्वाचित चेअरमन,व्हा.चेअरमन व सर्व संचालक मंडळांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here