सावधान! माणसाला झॉम्बी बनवणारा कोरोनापेक्षाही महाभयंकर व्हायरस आला!

0
252
जामखेड न्युज – – – 
गेल्या दोन वर्षांहून अधिक काळापासून जगभरात कोरोनाची दहशत आहे. आजही जग कोरोनाच्या सावटाखाली जगतंय. कोरोनासारख्या महामारीच्या विळख्यातून आता कुठे जग सावरतंय. अशातच, पुन्हा एका महाभयंकर व्हायरसने डोकं वर काढलं आहे. आजपर्यंत फक्त चित्रपटात तुम्ही झोम्बींना पाहिलं असेल. झोम्बी बनलेली माणसं दुसऱ्या माणसांवर तुटून पडतात. मग त्यांच्या चावण्याने किंवा प्रभावाने इतर माणसंही झोम्बी बनतात अशी इतकीच माहिती आपल्या झॉम्बीबद्दल आहे. बऱ्याचदा गम्मत म्हणून तुम्ही चित्रपटातल्या झोम्बीची नक्कल देखील केली असेल. मात्र, आता असा एक व्हायरस पसरतोय ज्यामुळे तुम्ही खरोखर झॉम्बी बनू शकता. मुळात ज्या वेगाने हा व्हायरस पसरतोय तो चिंताजनक आहे.
कोरोना व्हायरसनंतर आता झोम्बी व्हायरसचा धोका आहे. सध्या हा व्हायरस हरणांमध्ये सापडला आहे. कॅनडातील हरणांना झोम्बी व्हायरसची लागण झाली आहे.
हरणांमध्ये हे संक्रमण वेगाने पसरते आहे. या व्हायरसची लागण झालेलं हरण दुसऱ्या हरणांची शिकार करून त्यांना आपलं भक्ष्य बनवत आहे. कॅनडातील काही भागात याला क्रोनिक वेस्टिंग डिसीज म्हणून घोषित करण्यात आलं आहे. युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टाचे वाइल्डलाइफ स्पेस्लिस्ट मार्गो पिबस यांनी सांगितलं की ही महासाथ हरणांमध्ये वेगाने पसरते आहे.
CWD ने हरणांमधील हा व्हायरस इतर प्राणी किंवा इतर माणसांमध्येही पसरू शकतो, अशी चिंता व्यक्त केली आहे. माणसांना या व्हायरसची लागण फक्त प्राण्याचं मांस खाल्ल्याने नाही तर प्राण्याची लघवी, लाळ, थूंक याच्या संपर्कात आल्यानेही होऊ शकतो. या व्हायरसची लागण झाल्यास माणसांमध्ये डायरिया, डिप्रेशन आणि लकवा मारल्यासारखी लक्षणं दिसू शकतात. सुदैवाने अद्याप माणसांमध्ये या व्हायरसची लागण झाल्याचं एकही प्रकरण समोर आलेलं नाही.
कॅनडात हा आजार सर्वात आधी 1996 सालीसुद्धा आढळला होता. एका फार्ममध्ये हा व्हायरस पसरला. त्यानंतर इतर प्राण्यांमध्ये हा व्हायरस पसरत गेला. त्यानंतर या सर्व प्राण्यांना मारण्यात आलं. जेणेकरून इन्फेक्शनवर नियंत्रण मिळवता येईल. बॅक्टेरिया आणि इतर व्हायरसची जेनेटिक माहिती मिळू शकते पण हरणांमध्ये पसरणाऱ्या या व्हायरसबाबत माहिती मिळणं शक्य नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here