जामखेड न्युज – – – –
कर्जत-जामखेड मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार रोहित पवार हे मतदारसंघात कायम नवनवीन शासकीय योजना आणत असतात. तसेच विविध उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना त्याचा फायदा करून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील असतात. जामखेड तालुक्यातील साकत येथे उभारण्यात आलेल्या सोलर प्रकल्पाचे उद्घाटन उद्या शनिवारी सकाळी नऊ वाजता आमदार रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे तरी कार्यक्रमास परिसरातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सरपंच हनुमंत पाटील यांनी केले आहे.
३.१ मेगावॉट एवढी क्षमता असलेला सोलार प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झालेला आहे त्यांचे उद्घाटन कर्जत-जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहित पवारांच्या हस्ते होणार आहे यावेळी EESL कंपनीचे किरण गवाटे व मनिष स्वप्निल तसेच जामखेड महावितरणचे उपअभियंता योगेश कासलीवाल, जमदाडे साहेब यांच्या सह परिसरातील शेतकरी तसेच महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
मागील महिन्यात कर्जत तालुक्यातील आंबिजळगाव येथे सोलर प्लॅन्टचे उद्घाटन आमदार रोहित पवारांच्या हस्ते करण्यात आले होते यामुळे विज उपकेंद्रामधून विद्युत पुरवठा होणाऱ्या आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे तसेच ठराविक गावातील शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा देण्यासाठीही मदत झाली आहे.
शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन आमदार रोहित पवारांनी मतदारसंघात सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी विशेष प्रयत्न केले. मतदारसंघात सध्या एकूण 24 मेगावॉट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून होत आहे. त्याचा एकूण खर्च हा 150 कोटींच्या जवळपास आहे. सतत मतदारसंघात विविध माध्यमातून विकास कामे व शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोचवण्याचे काम आमदार रोहित पवार करत असल्याने नागरिकांकडूनही त्यांच्या कामाबद्दल कौतुक करून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्याने व ऊर्जा मंत्री नितीन राऊत, उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मदतीने, मी शेतकऱ्यांच्या हितासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात सोलार प्रकल्पाचे काम कर्जत व जामखेडमध्ये करू शकत आहे. या प्रकल्पाचा फायदा शेतकऱ्यांना होईल व त्यांची विजेची अडचण या माध्यमातून कायमची दूर होईल, असा विश्वास आहे. – आमदार रोहित पवार
उद्या साकत येथिल सोलर प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी परिसरातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सरपंच हनुमंत पाटील यांनी केले आहे.