मालगाडीचे आठ डबे रुळावरून घसरले, रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत

0
252
जामखेड न्युज – – – 
औरंगाबाद येथील दौलताबाद रेल्वे स्टेशनजवळ मालगाडीचा रॅक घसरण्याची घटना शनिवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे नांदेड- मुंबई रेल्वे मार्गावरील सर्व रेल्वे गाड्यांची वाहतूक ठप्प झालेली आहे.
 दौलताबाद रेल्वेस्टेशनजवळ रेल्वे मालगाडी रॅक घसरली. यात एका रुळावरून थेट दुसऱ्या रुळावर अशा अवस्थेत हे रॅक घसरले. त्यामुळे रेल्वे गाड्यांची वाहतूक बंद पडली. घटनेची माहिती मिळताच औरंगाबाद रेल्वे स्टेशन व्यवस्थापक लक्ष्मीकांत जाखडे, अशोक निकम यांच्यासह रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.
रेल्वे वाहतूक काही तास ठप्प राहणार आहे.  रोटेगाव काचीगुडा पॅसेंजर पोटूळ रेल्वे स्टेशनवर, जालना दादर जनशताब्दी औरंगाबाद स्टेशनवर, निजामाबाद पुणे पॅसेंजर औरंगाबाद स्टेशनवर, अमृतसर नांदेड सचखंड एक्सप्रेस लासुर स्टेशनवर थांबविण्यात आली आहे. दौलताबाद जवळ रेल्वे रुळावरून मालगाडीचे 8 डब्बे घसरल्याने रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यासाठी किमान दुपारी 12 ते 1 वाजतील असा प्राथमिक अंदाज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here