जामखेड न्युज – – – –
मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh News) सतनामध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगणारी एक महिला गर्भवती झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात प्रशासनाने दावा केला आहे की, महिला काही वेळासाठी जामिनावर बाहेर होती. यादरन्यान तिला गर्भधारणा झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
सतना तुरुंगात जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या संलग्नपणे आरोग्य तपास शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. यादरम्यान महिला आणि पुरुषांची तपासणी करण्यात आली. यादरम्यान या महिला कैदीने पोटदुखीसंदर्भातील तक्रार सांगितली. यासाठी महिलेची सोनोग्राफी करण्यात आली. यात महिला कैदी गर्भवती असल्याचं समोर आलं. ही बाब समोर आल्यानंतर तुरुंग प्रशासनाने या प्रकरणात तपास सुरू केला आहे.
2016 पासून सुरू आहे केस..
सतना तुरुंग प्रशासनानुसार, महिला कैदीवर पती आणि सासूच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. 2016 पासून तिच्याविरोधात सुनावणी सुरू आहे. महिला खजुराहो येथील राहणारी आहे आणि 28 फेब्रुवारी 2022 रोजी तिला छतरपूर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 12 मार्च रोजी सतनाच्या तुरुंगात आणण्यात आलं होतं. यादरम्यान महिला जामिनावर बाहेर आली होती. यादरम्यान तिला गर्भधारणा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण तपासात ती पाच आठवड्यांची गर्भवती असल्याचं समोर आलं आहे.