जामखेड रत्नदीप कॉलेजच्या विद्यार्थ्याचे इतर कॉलेजमध्ये होणार समायोजन विद्यार्थ्यांना वेठीस धरल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करणार – पांडुरंग भोसले

0
643

जामखेड न्युज——

जामखेड रत्नदीप कॉलेजच्या विद्यार्थ्याचे इतर कॉलेजमध्ये होणार समायोजन

विद्यार्थ्यांना वेठीस धरल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करणार – पांडुरंग भोसले

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून रत्नदीप मेडिकल फौंडेशन रिसर्च सेंटर संचलित रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसी, रत्नापूर, ता. जामखेड जि. अहिल्यानगर या महाविद्यालयातील सध्या अस्तित्वात असलेल्या पदवी, पदवीव्युतर विद्यार्थ्यांचे इतर महाविद्यालयांमध्ये समायोजन करण्यात यावे यासाठी नवीन महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणेबाबतची प्रक्रिया विद्यार्थ्यांनी २२ मार्च पूर्वी पूर्ण करावी असे पत्र उपकुलसचिव शैक्षणिक विभाग सलंग्नन्न कक्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांनी काढले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची समायोजनची अनेक दिवसाची मागणी मान्य झाल्याने समाधान व्यक्त केले आहे.

सदर शर्तीचे रत्नदीप मेडिकल फौंडेशन अॅण्ड रिसर्च सेंटरचे, रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसी, रत्नापूर, ता. जामखेड, जिल्हा अहिल्यानगर यांचेकडून पूर्तता, अनुपालन करण्यात आलेले नाही. महाविद्यालयाने दिनांक १५ जानेवारी, २०२५ रोजी सादर केलेला अनुपालन अहवाल व त्यासोबतच्या कागदपत्रावरून प्रथम दर्शनी दिसून आल्यामुळे, नैसर्गिक न्यायतत्वास अनुसरून संलग्नीकरणाचे नूतनीकरण करताना विनिर्दिष्ट केलेल्या शर्तीचे अनुपालन केले असल्यासंबंधीची संबंधित कागदपत्रे आठ दिवसाच्या आत संस्थेचे अध्यक्ष, सचिव यांनी प्रत्यक्ष हजर राहून सादर करण्यासाठी व त्याबाबत त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी पुनःश्च संधी देण्यात आली होती.

परंतु सदर कालावधीतही संबंधित संस्थेने व महाविद्यालयाने शैक्षणिक वर्ष २०२४-2025 प्रवेश,शैक्षणिक दस्तऐवज / शैक्षणिक शुल्कामुळे व इतर आवश्यक कागदपत्रांसाठी भविष्यात काही कायदेशीर तकारी व न्यायालयीन प्रकरण उदभवल्यास याबाबतची संपूर्ण जबाबदारी रत्नदीप मेडिकल फौंडेशन अॅण्ड रिसर्च सेंटर या संस्थेची व रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसी, रत्नापूर या महाविद्यालयाची राहील, याबाबत गांभिर्याने नोंद घेण्यात यावी.

सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी मूळ महाविद्यालयातील प्रवेश रद्द करुन सर्व दस्तऐवजासह समायोजित करण्यात आलेल्या नवीन महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणेबाबतची प्रक्रिया दिनांक २२/०३/२०२५ पूर्वी पूर्ण करावी. तद्अनुषंगाने दिलेल्या मुदतीत सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी समायोजित करण्यात आलेल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश न घेतल्यास याची संपूर्ण जबाबदारी सर्व संबंधित विद्यार्थ्यांची राहणार आहे.

तसेच ज्या विद्यार्थ्यांचे नाव सोबत जोडलेल्या यादीत आढळून न आल्यास शैक्षणिक विभाग संलग्नता कक्षासी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठाशी संलग्न ज्या औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयामध्ये सदर विद्यार्थ्यांचे समायोजन करण्यात येईल त्या महाविद्यालयांनी देखील विद्यार्थ्यांची संबंधित अभ्यासक्रमाच्या संबंधित वर्षाची प्रवेश प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

चौकट
कॉलेजने पुन्हा विद्यार्थांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला तर पुन्हा आंदोलन – पांडुराजे भोसले

रत्नदिप मेडीकल फाउंडेशन कॉलेज चे संस्थाचालक यांनी वेळोवेळी विद्यार्थ्यांना वेठीस धरलेले आहे पास आउट झालेले अनेक विद्यार्थ्याचें कागदपत्रे दिलेले नाहीत. शैक्षणिक आर्थिक शाररीक मानसिक त्रास विद्यार्थाना दिला गेला आहे. अनेकांची फि जमा करुन घेतली पण पावती दिली गेली नाहीअसे अनेक उदाहरणे विद्यार्थ्यांचे ट्रान्सफर झाले आहे त्यांना टी सी कागद पत्रे कॉलेजने ताबडतोब दिले पाहिजे तसे पत्रक पुणे विद्यापीठाने दिले आहे. जर कॉलेजने पुन्हा विद्यार्थांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला तर पुन्हा आंदोलन छेडले जाईल याची प्रशासनाने दखल घ्यावी पांडुराजे मधुकर भोसले श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेड तालुका अध्यक्ष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here