तांत्रिक अडचणींमुळे निधी परत गेला यात ग्रामीण रुग्णालयाचा हलगर्जीपणा नाही – अधीक्षक डॉ. संजय वाघ

0
191
जामखेड प्रतिनिधी 
             जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
    तांत्रिकदृष्ट्या आलेल्या अडचणी मुळे निधी परत गेला  यात ग्रामीण रुग्णालयाचा कसलाही हलगर्जीपणा नाही आमची खरेदीची मर्यादा तीन लाखांपर्यंत होती त्यामुळे आमच्या खरेदीवर मर्यादा आली आम्ही आरोळे कोविड सेंटरच्या मागणीनुसार औषधांचा पुरवठा केलेला आहे. तांत्रिकदृष्ट्या काही अडचणी आल्यामुळे निधी परत गेला आहे यात ग्रामीण रुग्णालयाचा कसलाही हलगर्जीपणा नाही असे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय वाघ यांनी जामखेड न्युजशी बोलताना सांगितले.
       येथील ग्रामीण रुग्णालयाला कोविडसाठी आलेला दहा लाखांच्या निधीपैकी फक्त चार लाख खर्च झाला आहे, तर सहा लाख रुपये खर्च न करता वरिष्ठ कार्यालयाला ग्रामीण रुग्णालयाने परत पाठवले आहे. याबाबत ग्रामीण रुग्णालयाची कोविडबाबत उदासीनता दिसून येत आहे. माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या माहितीच्या आधारे ही माहिती उघड झाली आहे. येथील ग्रामीण रुग्णालयाने कोविड सेंटर उभारले नव्हते परंतु कोविडच्या दुसर्‍या लाटेत तालुक्यातील जवळपास सात हजार रुग्ण बाधित झाले होते. रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक औषधे, इतर खर्च करणे आवश्यक होते. शासनाने कोविड रुग्णांसाठी दहा लाख निधी दिला होता. आमदार रोहित पवार यांनी पुढाकार घेऊन कोविड रुग्णांच्या उपचारासाठी स्वत: व शासनाच्या मदतीने डॉ. आरोळे हॉस्पिटल व लगत जम्बो हॉस्पिटल उभारले होते. आरोळे हॉस्पिटलला रुग्णांच्या उपयोगांसाठी आमदार रोहित पवार यांनी मोठ्या प्रमाणावर साहित्य, औषधे व अन्नधान्य, तसेच जामखेडच्या जनतेने लोकवर्गणी व अन्नधान्य दिले होते.  जम्बो हॉस्पिटलला वीज गेल्यावर जनरेटरमार्फत वीज पुरवठा करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाने तीन लाख रुपयांचा जनरेटर खरेदी करून दिला. एक लाख दहा हजार रुपये औषधासाठी खर्च केले, तर इतर सर्व खर्च आमदार रोहित पवार यांनी केला. त्यामुळे सात हजारच्या आसपास रुग्णांवर मोफत उपचार केले होते. ग्रामीण रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे जवळपास सहा लाख रुपये परत गेले. असा आरोप करण्यात आला होता.
        याबाबत वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय वाघ यांनी जामखेड न्युजशी बोलताना सांगितले की, दहा लाख रुपये यंत्रसामग्री व औषधांसाठी आलेले होते. ग्रामीण रुग्णालयाने आरोळे कोविड सेंटरच्या मागणीनुसार औषधांचा पुरवठा केला यासाठी एक लाख दहा हजार रुपये लागले व तीन लाख रुपये जनरेटर खरेदीसाठी लागले. बाकी पैसे काॅट व इतर साहित्य खरेदीसाठी ठेवले होते. आर्थिक वर्ष २०-२१ मध्ये आम्ही चार लाख २१ हजार रुपयांची खरेदी प्रक्रिया राबविण्यात आली होती जिल्हा रूग्णालयाच्या टेंडर प्रक्रियेनुसार ही प्रक्रिया राबवली होती पण आम्हाला आॅब्जेक्शन लागले वेळ कमी होता कमी वेळेत आम्ही वित्त विभागाची परवानगी घेऊ शकलो नाही. आमची खरेदीची मर्यादा तीन लाखांपर्यंत होती. आम्ही काॅट खरेदीचे सर्व बाबी पुर्ण केल्या होत्या पत तांत्रिक अडचणींमुळे ते नामंजूर झाले व निधी परत वरीष्ठ  कार्यालयाकडे वर्ग झाला यात ग्रामीण रुग्णालयाची कसलीही चूक नाही.
     चालू आर्थिक वर्षांसाठी २०२१ – २२ मध्ये परत निधी आलेला आहे.  आरोळे कोविड सेंटरचे आॅक्सिजनचे बील सात लाख ६५ हजार ७७६ रूपये आलेले आहे. वरीष्ठ कार्यालय  या निधीतूनच बील भरणार आहे. तांत्रिक अडचणींमुळे निधी परत गेला यात कोणाचीच कसलीही चूक नाही असे डॉ. वाघ यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here