मोरे यांच्या काॅलेजची एसआयटी मार्फत चौकशी होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भास्कर मोरेला खडी फोडायला लावणारच – आमदार प्रा राम शिंदे

0
2690

जामखेड न्युज——

मोरे यांच्या काॅलेजची एसआयटी मार्फत चौकशी होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

भास्कर मोरेला खडी फोडायला लावणारच – आमदार प्रा राम शिंदे

 

रत्नदीप मेडिकल फाउंडेशनच्या तक्रारी विरोधात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी गठित करून लवकरात लवकर उच्च स्तरीय चौकशी करू
यामध्ये कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही मोरे याची एसआयटी मार्फत चौकशी करून
दोषींवर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनी करून आंदोलन कर्ते पांडूरंग भोसले व विद्यार्थांना दिले.

रत्नदीप मेडिकल कॉलेजवर कारवाई होण्यासाठी सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आमदार प्रा. राम शिंदे यांनी भेट घेऊन चार तास विद्यार्थ्यांच्या तीव्र भावना जाणून घेतल्या नंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी आमदार राम शिंदे यांनी स्पीकर आँन करून संवाद साधला यावेळी मोरे यांच्या सातही काॅलेजची मान्यता दोन दिवसात रद्द करण्याचे आश्वासन मंत्र्यांनी आंदोलन कर्त्यां विद्यार्थ्यांना दुरध्वनी करून दिले.

यावेळी आण्णासाहेब सावंत, आरपीआय जिल्हाअध्यक्ष सुनील साळवे, अमित चिंतामणी, डॉ. भगवान मुरूमकर, केदार रसाळ, बिभीषण धनवडे, शरद कार्ले, सोमनाथ राळेभात, प्रविण चोरडिया, अर्जुन म्हेत्रे, पवन राळेभात, रवी सुरवसे, प्रविण सानप, तुषार बोथरा, अल्ताफ शेख, उद्धव हुलगुंडे, वैजनाथ पाटील यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

गेल्या नऊ दिवसांपासून रत्नदीप मेडिकल फाउंडेशन विरोधात तसेच भास्कर मोरे याला अटक करण्यात यावी या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन व शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे पांडूरंग भोसले यांचे उपोषण सुरूच आहे. या आंदोलनाला सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे याच अनुषंगाने आज जामखेड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.

याच अनुषंगाने आज बुधवार दि. १३ रोजी आमदार प्रा. राम शिंदे यांनी उपोषण स्थळी जात विद्यार्थ्यांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी आमदार प्रा. राम शिंदे यांनी सांगितले की, माझ्या राजकीय कारकीर्दीतील महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे सर्वात मोठे आंदोलन आहे. याची मला जाणीव आहे. तुमच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे. तुमचे शैक्षणिक नुकसान होणार नाही तसेच तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. मोरेला खडी फोडायला लावल्याशिवाय स्वस्त बसणार नाही.

मोरे यांच्या काॅलेजच्या सर्व मान्यता रद्द करण्याची मागणी वैद्यकीय शिक्षण मंत्री व उच्च तंत्र शिक्षण मंत्री यांच्या कडे केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी काळजी करू नये. असे आश्वासन दिले. तसेच रिव्हॉल्वर चे लायसन्स रद्द करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना दिल्या आहेत.

विद्यार्थ्यांच्या अतिशय तीव्र स्वरूपाच्या तक्रारी आहेत. त्या शासन दरबारी मांडल्या आहेत याची शासनाने गंभीर दखल घेतली आहे.

रत्नदीप मेडिकल फाउंडेशन आवारात वनविभागाला मृत हरणाचे काही अवशेष सापडले आहेत आणि ते नागपूर येथे फाँरेन्शिक लँबकडे पाठवले आहेत. तो तपासणी अहवाल प्राप्त झाल्यावर मोरे जर दोषी आढळले तर खडी फोडण्यापेक्षा हा गुन्हा कडक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here