जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
स्वयंम शिक्षण प्रयोग जामखेड WHH, GIZ व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमानाने महिला स्वयं सहाय्यता समूहासाठी चालू असलेला प्रकल्प ब्रेकिंग द चैन – अ मल्टीसेक्टर अप्रोच टू ऍड्रेस मालन्यूट्रिशन इन महाराष्ट्र, या प्रकल्पअंतर्गत महिलांना 2 दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे आयोजन पंचायत समिती जामखेडचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आले.
पहिल्या दिवशी उमेद अभियानाचे तालुका व्यवस्थापक स्वप्नील नेहरकर, प्रभाग समन्वयक गोकुळ जायभाय स्वयंम शिक्षण प्रयोगच्या प्रकल्प व्यवस्थापक तबसुम मोमीन, जिल्हा समन्वयक बाळासाहेब काळदाते, माधव गोरकटे, यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, स्वयंम शिक्षण प्रयोगचे प्रशिक्षण समन्वयक बाळासाहेब काळदाते तर प्रस्ताविक माधव गोरकटे यांनी करून दिली. या प्रशिक्षणात तबसुंम मोमीन यांनी महिलांना कुपोषनाची कारणे ,त्यासाठी संतुलित आहार वापर आहारातील गट या बदल मार्गदर्शन केले.
दुसऱ्या दिवशी उमेदचे जिल्हा व्यवस्थापक मार्केटिंग श्री अतुल चाटे, जिल्हा व्यवस्थापक उपजीविका सारिका रोहकले, तालुका व्यवस्थापक स्वप्नाली तोडमल, प्रभाग समन्वयक हारीबा चांदगावे हे उपस्थित होते. महिलांनी वेगवेगळ्या प्रकाचे व्यवसाय सुरू केल्या शिवाय शाश्वत विकास होणार नाही हे जिल्हा व्यवस्थापक मार्केटिंग चाटे सरांनी पटऊन सांगितले, तसेच मागणी पाहून व्यवसाय निवडण्याचे आव्हान केले. तसेच रोहकले मॅडम यांनी उपजिविकेसाठी वेगवेगळ्या छोट्या मोठ्या व्यवसाय करून उपजीविका करावी असे सांगितले. तालुका व्यवस्थापक तोडमल मॅडम यांनी महिलांना मार्गदर्शन केले.
स्वयंम शिक्षण प्रयोगचे नवनाथ वाघमोडे यांनी सेंद्रिय शेती पद्धती या बदल मार्गदर्शन केले. रुपाली अनभुले, मालन कचरे, अर्चना वारे, कविता भुतकर यांनी SSP व उमेद अभियानामुळे त्यांच्या शेतामध्ये झालेल्या बदलाचे अनुभव कथन केले या कार्यशाळेत गावातून 35 CRP उपस्थित होत्या. ह्या कार्यशाळेचे नियोजन व व्यवस्थापन तालुका समन्वयक नवनाथ वाघमोडे व शीला भोजने यांनी केले









