Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या शिल्पकार प्रमोद कांबळे ‘अयोध्या’ महोत्सवात विशेष आमंत्रित कलाकार

शिल्पकार प्रमोद कांबळे ‘अयोध्या’ महोत्सवात विशेष आमंत्रित कलाकार

0
323
जामखेड न्युज – – – 
प्रभू श्रीरामाची जन्मभूमी असलेल्या उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य उत्सवानिमित्त भव्य अयोध्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कलारंग असलेल्या या महोत्सवात देशभरातील कलाकारांना निमंत्रित करण्यात आले आहे.
यात नगरचे प्रसिध्द चित्र शिल्पकार प्रमोद कांबळे हे विशेष आमंत्रित कलाकार म्हणून उपस्थित राहणार आहेत. कला क्षेत्रातील कांबळे यांचे उत्तुंग योगदान लक्षात घेवून त्यांना या महोत्सवात मार्गदर्शनासाठी विशेष निमंत्रण देण्यात आले आहे. दि.6 जानेवारीपर्यंत हा महोत्सव चालणार आहे.
यात प्रमोद कांबळे हे शिल्पकला व चित्रकला उपक्रमाचे उद्घाटन करणार असून ते प्रात्यक्षिक सादर करून उपस्थित कलाप्रेमी, कला अभ्यासक, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. अयोध्येत सध्या भव्य श्रीराम मंदिराचे निर्माण चालू आहे. याच पवित्र भूमीतील कला महोत्सवात सहभागी होण्याची संधी मिळणे ही अतिशय आनंदाची गोष्ट असल्याचे कांबळे यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!