जामखेड तालुका गणित-विज्ञान कार्यकारिणी जाहीर, गणिताचे चंद्रकांत डुचे, विज्ञानाचे विक्रम भोगे अध्यक्षपदी ५१ व्या तालुकास्तरीय गणित-विज्ञान प्रदर्शनाच्या नियोजन बैठकीत दोन वर्षांसाठी नवीन कार्यकारिणीची निवड
जामखेड तालुका गणित-विज्ञान कार्यकारिणी जाहीर, गणिताचे चंद्रकांत डुचे, विज्ञानाचे विक्रम भोगे अध्यक्षपदी
५१ व्या तालुकास्तरीय गणित-विज्ञान प्रदर्शनाच्या नियोजन बैठकीत दोन वर्षांसाठी नवीन कार्यकारिणीची निवड
जामखेड तालुका गणित-विज्ञान अध्यापक संघटनेची सहविचार सभा शुक्रवार, दि. २७ नोव्हेंबर रोजी कन्या विद्यालय, जामखेड येथे आयोजित करण्यात आली होती. आगामी ५१ व्या तालुकास्तरीय गणित-विज्ञान प्रदर्शनाच्या आयोजनासंदर्भात चर्चा करण्यासाठी आयोजित या सभेत तालुका गणित व विज्ञान संघटनेची पुढील दोन वर्षांसाठी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
सभेस तालुका शिक्षण विस्ताराधिकारी जालिंदर खताळ, मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष दशरथ कोपनर, माध्यमिक शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुदाम वराट, मुख्याध्यापक भरत लहाने, साळवे सर, दत्ता काळे, दत्तात्रय राजमाने, सूर्यकांत कदम, भोर मॅडम यांच्यासह तालुका गणित संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब इथापे, विज्ञान संघटनेचे अध्यक्ष बाजीराव गर्जे तसेच तालुक्यातील गणित व विज्ञान अध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गणित संघटनेची कार्यकारिणी दोन वर्षांसाठी जाहीर करण्यात आलेल्या तालुका गणित संघटनेच्या कार्यकारिणीत अध्यक्षपदी चंद्रकांत डुचे (नागेश विद्यालय, जामखेड), उपाध्यक्षपदी शिवाजी गायकवाड (केदारेश्वर विद्यालय, जातेगाव), सचिवपदी सागर दळवी (जिजामाता माध्यमिक हायस्कूल, देवदैठण) आणि जिल्हा प्रतिनिधीपदी संतोष ससाणे (नागेश विद्यालय, जामखेड) यांची निवड करण्यात आली.
विज्ञान संघटनेची कार्यकारिणी तालुका विज्ञान संघटनेच्या अध्यक्षपदी विक्रम भोगे (कन्या विद्यालय, जामखेड), उपाध्यक्षपदी प्रदीप ससाणे (विंचरणा विद्यालय, पिंपरखेड), सचिवपदी अमोल भोंडवे (श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, जवळा) आणि जिल्हा प्रतिनिधीपदी रोहित घोडेस्वार (ल. ना. होशिंग विद्यालय, जामखेड) यांची निवड करण्यात आली.
प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी सहकार्याचे आवाहन यावेळी शिक्षण विस्ताराधिकारी जालिंदर खताळ यांनी मार्गदर्शन करताना, ५१ वे तालुकास्तरीय गणित-विज्ञान प्रदर्शन यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी आजी-माजी पदाधिकारी व शिक्षकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन करून त्यांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या सभेमुळे आगामी गणित-विज्ञान प्रदर्शनाच्या आयोजनाला गती मिळणार असून, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, गणिती कौशल्य आणि संशोधनाची आवड निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी एकत्रित प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला.