Home ताज्या बातम्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या शैक्षणिक कर्जासाठी पाठपुरावा करणार – सचिन घुमरे सचिन घुमरे...

शेतकऱ्यांच्या मुलांच्या शैक्षणिक कर्जासाठी पाठपुरावा करणार – सचिन घुमरे सचिन घुमरे यांचा दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या पतसंस्थेकडून गौरव!

0
7
शेतकऱ्यांच्या मुलांच्या शैक्षणिक कर्जासाठी पाठपुरावा करणार – सचिन घुमरे  सचिन घुमरे यांचा दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या पतसंस्थेकडून गौरव!

जामखेड न्युज – – – – – 

शेतकऱ्यांच्या मुलांच्या शैक्षणिक कर्जासाठी पाठपुरावा करणार – सचिन घुमरे

सचिन घुमरे यांचा दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या पतसंस्थेकडून गौरव!

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सचिन (नाना) घुमरे यांचा शनिवार दि ३१ रोजी पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या पगारदार नोकरांच्या सहकारी पतसंस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी घुमरे यांनी शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक कर्ज मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही देत, बँकेचा कारभार सर्वसामान्यांना आपली हक्काची बँक वाटेल, अशा पद्धतीने करण्याचा प्रयत्न राहील, असे प्रतिपादन केले.

 

यावेळी पतसंस्थेचे चेअरमन प्रा. सुनील नरके, व्हाइस चेअरमन उमाकांत कुलकर्णी, सचिव तथा मुख्याध्यापक भरत लहाने, संचालक तथा प्राचार्य बी. ए. पारखे, उपमुख्याध्यापक अनिल देडे, पर्यवेक्षक सुदाम वराट, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व विद्यमान संचालक कैलास वराट, हनुमंत वराट, बाबासाहेब धनवडे, रोहित घोडेस्वार, सचिव दत्ता वीर, बंडू सुळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पतसंस्थेच्या इतिहासाला उजाळा
यावेळी प्रा. सुनील नरके यांनी पतसंस्थेच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीचा व कार्याचा आढावा घेतला. संस्थेने आजवर केलेल्या कामाची माहिती देत भविष्यातही सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. सहकाराच्या माध्यमातून सभासदांचे आर्थिक हित जपणे आणि संस्थेची प्रगती साधणे यासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्नशील
सत्काराला उत्तर देताना सचिन घुमरे यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकरी कुटुंबांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज मिळवून देण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बँकेचा कारभार पारदर्शक, लोकाभिमुख आणि सर्वसामान्यांना विश्वास देणारा असावा. शेतकरी, सभासद आणि गरजू नागरिकांना बँक आपली हक्काची वाटली पाहिजे, या भावनेतून काम करण्याचा प्रयत्न राहील, अशी ग्वाहीही घुमरे यांनी दिली.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व विद्यमान संचालक कैलास वराट यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक व उपमुख्याध्यापक अनिल देडे यांनी तर आभार संचालक व पर्यवेक्षक सुदाम वराट यांनी मानले या सत्कार सोहळ्यामुळे उपस्थितांनी सचिन घुमरे यांचे अभिनंदन केले. सहकार क्षेत्रातील त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!