Saturday, October 24, 2026
Home ताज्या बातम्या जिल्हा बँकेचे नूतन संचालक सचिन (नाना) घुमरे यांचा सनराईज फाउंडेशनतर्फे सन्मान!

जिल्हा बँकेचे नूतन संचालक सचिन (नाना) घुमरे यांचा सनराईज फाउंडेशनतर्फे सन्मान!

0
2
जिल्हा बँकेचे नूतन संचालक सचिन (नाना) घुमरे यांचा सनराईज फाउंडेशनतर्फे सन्मान!

जामखेड न्युज – – – – – 

जिल्हा बँकेचे नूतन संचालक सचिन (नाना) घुमरे यांचा सनराईज फाउंडेशनतर्फे सन्मान!

अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झालेले नूतन संचालक सचिन (नाना) घुमरे यांचा सनराईज मेडिकल अँड एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. जामखेड येथील संस्थेच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय भोरे यांच्या हस्ते घुमरे यांचा सन्मान करण्यात आला.

अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालकपदी सचिन (नाना) घुमरे यांची बिनविरोध निवड झाल्याने जामखेडच्या सहकार क्षेत्रात त्यांचे अभिनंदन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर सनराईज मेडिकल अँड एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

या सत्कार समारंभाला संस्थेचे संचालक प्रा. तेजस भोरे, विठ्ठलराव घुमरे सर, सचिन भोरे, दिनकर भोरे, लोणी सोसायटीचे सचिव अनिरुद्ध धेंडे, प्रा. विनोद बहिर, प्रा. प्रदीप भोंडवे, प्रा. महेश घुमरे, प्रा. गावीत, सूरज वाघमारे यांच्यासह संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी सचिन (नाना) घुमरे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या बिनविरोध निवडीमुळे जामखेडच्या सहकार क्षेत्रात त्यांना जिल्हा पातळीवर काम करण्याची संधी मिळाली आहे.

या निवडीच्या निमित्ताने आयोजित सत्कार कार्यक्रमातून त्यांच्याप्रती असलेला स्नेह आणि सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!