Monday, September 14, 2026
Home ताज्या बातम्या गणेश स्थापनेच्या दिवशी मतेवाडीत शोककळा, ट्रॅक्टरच्या चाकाखाली एकुलत्या एक चिमुकल्याचा दुर्दैवी...

गणेश स्थापनेच्या दिवशी मतेवाडीत शोककळा, ट्रॅक्टरच्या चाकाखाली एकुलत्या एक चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

0
2
गणेश स्थापनेच्या दिवशी मतेवाडीत शोककळा,  ट्रॅक्टरच्या चाकाखाली एकुलत्या एक चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

जामखेड न्युज – – – – – 

गणेश स्थापनेच्या दिवशी मतेवाडीत शोककळा

ट्रॅक्टरच्या चाकाखाली एकुलत्या एक चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

 

 

गणेश स्थापनेच्या दिवशीच जवळा-मतेवाडी परिसरावर दुःखाची छाया पसरली. मतेवाडी (जवळा) येथे सोमवारी, दि. १४ सप्टेंबर रोजी दुर्दैवी अपघातात देवांश सचिन मते या सव्वा वर्षाच्या एकुलत्या एक चिमुकल्याचा ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू झाला. या घटनेने मतेवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत असून मते कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, देवांशचे वडील सचिन सुग्रीव मते हे स्वतः मका कुट्टी करून शेतातून ट्रॅक्टर घेऊन घरी आले होते. यावेळी घराच्या परिसरात देवांश खेळत होता. खेळता खेळता तो ट्रॅक्टरच्या जवळ गेल्याचे वडिलांच्या लक्षात आले नाही. त्याचदरम्यान तो ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने हा दुर्दैवी अपघात घडला.

या घटनेत गंभीर दुखापत होऊन देवांशचा जागीच मृत्यू झाला. चिमुकल्या देवांशच्या अचानक झालेल्या मृत्यूची बातमी परिसरात पसरताच नातेवाईक, ग्रामस्थ व नागरिकांनी मते कुटुंबीयांच्या घरी धाव घेतली. गणेश स्थापनेच्या आनंदाच्या दिवशीच घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने परिसरात शोककळा पसरली.

सव्वा वर्षाच्या चिमुकल्याचा असा दुर्दैवी अंत झाल्याने मते कुटुंबीयांवर मोठे दुःख कोसळले असून, परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. देवांश हा एकुलता एक मुलगा होता. नागरिकांनी वाहन चालवताना काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!