शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामखेडच्या वतीने तालुक्यातील बाल वीर पुरस्काराचे वितरण
विविध मान्यवरांच्या उपस्थितीत बाल शौर्य पुरस्काराचे वितरण
महाराष्ट्र शासन कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग मार्फत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामखेड यांच्या वतीने वीर बाल दिवस निमित्त बाल शौर्य पुरस्कार पुरस्कार जाहीर करण्यात आला.
ते पुढील प्रमाणे आहेत. शौर्य विभाग- श्रेयश महादेव धांडे नागेश विद्यालयात इयत्ता नववी मध्ये शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांने शेततलावामध्ये बुडत असलेल्या अकरावीच्या विद्यार्थ्यांला जीव धोक्यात घालून वाचवले.
कु. स्नेहल दत्तात्रय भोसले खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून दिले. पुणे विद्यापीठास सुवर्णपदक मिळवून दिले. राष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदक मिळवून दिले.
अशा या गुणी व होतकरू बालविरांचा आज विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष (आय एम सी सदस्य) मुख्याध्यापक दत्ता काळे, प्रमुख पाहुणे कॅप्टन लक्ष्मण भोरे, पत्रकार सुदाम वराट, मयूर भोसले, संतोष (बबलू) टेकाळे, संस्थेचे प्राचार्य अजय वाघ, के डी गायकवाड, विठ्ठल काळे, ओंकार पिसे, सतीश हारदे, विजयकुमार तवटे, जालिंदर सुसे, सुरेश मुळे, श्रीराम सकनुरे, ईश्वर सानप, विनायक किंबहुने, राजाभाऊ शिंदे,श्रीम सुरेखा महाडिक, निरपणे मॅडम, गायकवाड सर, जाधव सर, साळुंखे सर, सुद्रिक सर, आधी मान्यवर शिक्षक विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे मयूर भोसले म्हणाले की, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने अतिशयस्तुत्य कार्यक्रम घेतला आहे योग्य पुरस्कार दिले आहेत, संस्थेचा चांगला उपक्रम आहे. भविष्यात पुरस्काराचे स्वरूप मोठे करू असे सांगितले
प्रशिक्षक संतोष टेकाळे म्हणाले की, पहिलाच उपक्रम आहे शौर्य गाजवलेल्यांना सन्मानित केले आहे. समाजात यामुळे मोठी प्रेरणा मिळणार आहे.
प्राचार्य अजय वाघ म्हणाले की वीर बालकांचा सन्मान दरवर्षी करण्यात येणार आहे. झोकून देऊन काम केले कि, यश मिळतेच.
कॅप्टन लक्ष्मण भोरे म्हणाले की, बालवीरांनी आपले नाव देशात केले आहे असे कार्यक्रम आवश्यक आहेइतिहासाला जागृत करण्यासाठी असे कार्यक्रम आवश्यक आहेत समाज उपयोगी काम करा , देशासाठी उपयोगी काम करा असे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात बोलताना दत्ता काळे म्हणाले की, त्याग केल्यानेच आपले नाव अजरामर राहतेसकाळी लवकर उठा सराव करा, शारिरीक कसरत करा देशासाठी आपण काहीतरी केले पाहिजेदेश धर्म महत्त्वाचा आहे. आपण पवित्र भुमीत जन्माला आलो आहोत. तरूणांनी शारिरीक कसरत करावी अन्याय अत्याचार सहन करू नका मेहनत करा, कौशल्य प्राप्त करा असा सल्ला दिला.
प्रास्ताविक गजेंद्र जाधव, सूत्रसंचालन वैभव पवार, तर आभार प्रदर्शन अशोक सुद्रिक यांनी केलेशेवटी राष्ट्रीय मूल्य व शौर्य शपथ किरण साळुंखे यांनी सर्वांना दिली.