कविवर्य प्रा. आ. य. पवार यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त शाळा व वाचनालयास ग्रंथ व वाचन सुविधा भेट.
कविवर्य, विचारवंत साहित्यिक, ग्रामीण जीवनाचे अभ्यासक व विज्ञानकवी स्व.प्रा.आ.य.पवार यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त शाळा व गावाच्या वाचनालयास सुमारे २५ हजार रुपये किमतीची ग्रंथसंपदा तसेच वाचनासाठी आवश्यक टेबल, खुर्ची, कपाट आणि कायमस्वरूपी रोजची ६ दैनिके भेट देण्यात आली.
स्व.प्रा.पवार सरांच्या अथक प्रयत्नांमुळे केवळ चौथीपर्यंत असलेली बावी येथील जि. प. प्राथमिक शाळा सातवीपर्यंत विस्तारली. त्यांच्या संकल्पनेतून पेरलेल्या शैक्षणिक व साहित्यिक विचारांची बीजे आज वटवृक्षात रूपांतरित झाली असून अनेक विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थ त्याचा लाभ घेत आहेत.
जरी स्व. प्रा. पवार सर आज आपल्यात नसले, तरी त्यांनी दिलेला विचारांचा व साहित्याचा वारसा समाजाला दिशादर्शक ठरत असून दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करत राहील,अशी भावना यावेळी प्रसिद्ध निवेदक हनुमंत महाराज निकम यांनी व्यक्त केली.
या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त वाचनसंस्कृती वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने ग्रंथदान व वाचन सुविधा देण्याचा संकल्प मा.अवधूत पवार यांनी जाहीर केला. या उपक्रमामुळे माजी विद्यार्थी संघाचा उत्साह वाढून वाचन चळवळीला चालना मिळेल, असे मत शाळेचे मुख्याध्यापक अमोल पवार उपस्थित यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी सेवा निवृत्त कृषी अधिकारी सुंदरदास बिरंगळ,माजी मुख्याध्यापक देवकर गुरुजी, सरपंच महादेव कारंडे, सोसायटीचे व्हा.चेअरमन लालासाहेब पवार,माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष प्रा.बलभिम मुरुमकर,गावचे उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी तसेच माजी विद्यार्थी संघाचे सदस्य , शाळेचे शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.