विकास कामावर समोरासमोर चर्चा करण्यासाठी मी कधीही तयार – आमदार रोहित पवार नेते मला सोडून गेले त्याचे दुख नाही सामान्य जनता माझ्या बरोबर, प्रभाग अकरा मध्ये आमदार रोहित पवार यांची काँर्नर सभा संपन्न
विकास कामावर समोरासमोर चर्चा करण्यासाठी मी कधीही तयार – आमदार रोहित पवार
नेते मला सोडून गेले त्याचे दुख नाही सामान्य जनता माझ्या बरोबर, प्रभाग अकरा मध्ये आमदार रोहित पवार यांची काँर्नर सभा संपन्न
जामखेड नगरपरिषद निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाली उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा आहे मला घेरण्यासाठीसर्व जण येत आहेत. पण माझा विश्वास सामान्य नागरिकांवर आहे ते माझ्या बरोबर आहेत. कर्जत जामखेड मधील अनेक नेते सोडून गेले याचे कसलेही दुख वाटत नाही कारण माझ्या बरोबर सर्व सामान्य जनता आहे. असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.
जामखेड नगरपरिषद निवडणुक प्रभाग अकरा मध्ये आज काँर्नर सभा आयोजित करण्यात आली होती यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला यावेळीभानुदास बोराटे, विश्वनाथ राऊत, श्रीकांत लोखंडे,उमेदवार हरीभाऊ आजबे, अपूर्वा अमोल गिरमे,अमोल लोहकरे, सागर सदाफुले, सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे, राजुरीचे सरपंच सागर कोल्हे, शिवसेनेचे गणेश उगले यांच्या सह अनेक कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सभापती प्रा राम शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी विकास कामावर रोहित पवार यांनी समोरासमोर चर्चा करण्यासाठी यावे तसेच तुमचे नेते सोडून का गेले हे पाहावे याविषयी विचारले असता ते म्हणाले माझी विकास कामावर चर्चा करण्यासाठी कधीही तयारी आहे. तुम्ही ठिकाण व वेळ सांगा मी तयार आहे. तसेच नेते सोडून गेले याचे दुख नाही सामान्य जनता माझ्या बरोबर आहे.
यावेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, कर्जत जामखेड चे वजन संपूर्ण राज्यात वाढले आहे. मला घेरण्यासाठी उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री येत आहेत. एवढेच नाही तर आमच्या एका कार्यकर्त्यांविरोधात हक्कभंग दाखल करण्यात आला. यामुळे आता माझ्या बरोबर कार्यकर्ते यांचेही वजन वाढले आहे.
तसेच निवडणूक आयोग हा भाजपाचे ऐकत आहे. मुख्यमंत्री यांच्या सभेसाठी निवडणूक आयोगाने नियमात बदल केला आहे.
नगरपरिषद निवडणुकीत आमचे उमेदवार सर्व सामान्य आहेत तर समोरचे सावकार, मटका, गुंडागर्दी, अवैध धंदे वाले आहेत. आता जामखेड च्या विकासासाठी आपल्या अडचणी साठी तुम्ही कोणाला निवडणार सामान्य माणसाला तुम्ही हक्काने काम सांगू शकता समोरच्या उमेदवाराला काम सांगू शकत नाहीत.
आपल्या ताब्यात नगरपरिषद आल्यावर आपल्याला पाणीपुरवठा, रस्ते, भूमिगत गटारे हि कामे मार्गी लावता येतील. यासाठी सर्व सामान्य उमेदवार दिले आहेत. समोर दोन नंबर वाले आहेत.
चौकट आमदार रोहित पवार यांनी समोरच्या उमेदवारांची पोलखोल केली. कोणी सावकार, कोणी गुंड, कोणी मटका पेढी चालवणारे असे आहेत. याचा बिमोड करणार असल्याचे सांगितले.