आमदार अमित गोरखे यांना सभापती केल्याने मातंग समाजाचा मान वाढला – अमोल पुलवळे
महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या अनेक विविध प्रकारच्या घडामोडी घडतताना दिसून येत आहेत नुकत्याच विधानपरिषदेवर घेतलेल्या आमदार अमित गोरखे यांना राज्य सरकारने विधानपरिषदेत तालिकासभापती पद पद देऊन मातंग समाजाला सन्मानाचे स्थान दिल्याबद्दल समाज बांधवांच्या वतीने सरकारचे आभार सामाजिक कार्यकर्ते व मुख्य सचिव साहित्यरत्न प्रतिष्ठान अमोल पुलवळे यांनी मानले आहेत.
आमदार गोरखे यांच्या माध्यमातून समाजाला एक उच्चशिक्षित आमदार लाभला याबद्दल समाजामध्ये उत्साहाचे वातावरण व समाजाला एक दिशा देणारा नेता म्हणून समाजवर्ग यांच्याकडे पाहत आहे.
तरुण पिढीला दिशा देणारा नेता म्हणून सध्या तरुण पिढी गोरखे यांच्या कडे आदर्श युवा आमदार म्हणून पाहत आहे व मातंग समाजातील सुशिक्षित मुलं राजकारणाकडे कशी वळतील याचं आदर्श उदाहरण म्हणजेच अमित गोरखे आहेत.
म्हणून गोरखे यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहण्याचा निर्धार करीत आहे.. अमोल पुलवळे ( सामाजिक कार्यकर्ते व मुख्य सचिव साहित्यरत्न प्रतिष्ठान ), नामदेव पुलवळे सुनील पुलवळे, संपत पुलवळे, त्रिंबक फुलवळे, बंडू पुलवळे, कृष्णा पुलवळे समस्त समाज बांधव यांनी केले आहे.
चौकट पावसाळी अधिवेशनाच्या प्रारंभी महाराष्ट्र विधान परिषदेच्या तालिका सभापती पदी आमदारअमित गोरखे यांची निवड जाहीर झाली सरांच्या प्रामाणिक कामाला, अभ्यासू वृत्तीला आणि सर्वसामान्यांशी असलेल्या नात्याला मिळालेला हा सन्मान आमच्या सारख्या कार्यकर्त्यांसाठी मोठा अभिमानाचा क्षण आहे. नेहमी जिद्दीने आणि नम्रतेने वाटचाल करणाऱ्या सरांना मनापासून शुभेच्छा समाज बांधवांच्या वतीने दिल्या आहेत.