आजीच्या 78 व्या वाढदिवसानिमित्त नातवाकडून शालेय विद्यार्थ्यांना मिठाई वाटप

0
888

जामखेड न्युज——

आजीच्या 78 व्या वाढदिवसानिमित्त नातवाकडून शालेय विद्यार्थ्यांना मिठाई वाटप

78 वर्षीय आजीचा वाढदिवसानिमित्त नातूने जि.प.प्रा शाळेच्या मुख्याध्यापिका राजगुरू मँडम यांच्या हस्ते मिठाई शाळेत वाटप करून केला वाढदिवस साजरा केला आहे.


जि.प.प्रा.शाळा शुक्रवार पेठ येथे महिला मेळाव्व्याचे आयोजन औचित्य होते ते म्हणजे शुक्रवार पेठ येथील माजी केंद्रप्रमुख कै.रामचंद्र योगे यांच्या पत्नीचा 78वा वाढदिवस.या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे श्रीम.विमालताई यांच्या नातूने श्री.दत्ता योगे यांनी आपल्या आजीचा वाढदिवस शाळेत साजरा करण्याचे ठरवले.

त्या निमित्ताने परिसरातील सर्व महिला भगिनी मोठया प्रमाणात उपस्थित होत्या. प्रथम विमलताई यांना औक्षण करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्या देण्यात आल्या. सर्व महिलांची भाषणे झाली. पत्रकार संतोष थोरात यांनी उपस्थीत महिलांना अशा प्रकारे शाळेत वाढदिवस साजरे करून शाळेला मदत करावी असे आवाहन केले.

वाढदिवसा निमित्त सर्व विध्यार्थी पालक यांना मिष्टांन्न भोजन देण्यात आले.तसेच शाळेला 2 खुर्च्या व मोठे घड्याळ भेट दिले.अशा प्रकारे श्री.योगे यांनी समाजाला एक आदर्श घालून दिला.

कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.राजगुरू मॅडम यांनी सर्व महिलांना मार्गदर्शन करून शाळेच्या अडचणी सांगितल्या व शाळेस मदत करण्याचे आव्हान केले.शाळेच्यावतीने सर्व योगे कुटुंबीयांचा सत्कार करण्यातआला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here