जामखेड न्युज——
भास्कर मोरे च्या निषेधार्थ उद्या जामखेड बंद

डॉ. भास्कर मोरेच्या रत्नदीप मेडिकल फाउंडेशन
कॉलेजच्या पिळवणूकीच्या संबंधित गेल्या सात
दिवसापासून विद्यार्थ्यांचे आंदोलन व शिवप्रतिष्ठान चे उपोषण सुरू आहे. याच अनुषंगाने नाशिक व रायगड विद्यापीठाने केलेल्या तपासणीत चक्क मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थीना राहण्यासाठी होस्टेल म्हणून मंगल कार्यालयात ठेवण्यात आले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

यामुळे या संस्थेत कीती सावळा गोंधळ सुरु आहे हे लक्षात आले आहे. या कुकृत्य करणारे चाळेखोर भास्करला धडा शिकविण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी गेल्या सात शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे पांडूरंग भोसले उपोषण करत आहेत. उद्या भास्कर मोरे यांच्या निषेधार्थ जामखेड बंद ठेवण्यात आले आहे.

जामखे उद्या बुधवार दि १३/३/२०२४ रोजी जामखेड तालुका कडकडीत ठेवण्यात येणार आहे.
भास्कर मोरेंच्या काळ्या करामतींनी जामखेड तालुक्याची बदनामी झाली आहे.

पण आपल्या सर्व जामखेडवासीयांनी गेले आठ दिवस विद्यार्थीनी व विद्यार्थी यांच्या न्याय हक्कांसाठी श्री.पांडुरंग मधुकर भोसले सर्व विद्यार्थ्यांसह उपोषणाला बसले आहेत.उपोषणाला आपणही सर्वांनी भरपुर सहकार्य केले आहे आणि जामखेडचे लोकं चांगलेच आहेत हे दाखवुन दिले आहे.

पण एका बकासुरामुळे ऐतिहासीक जामखेडची बदनामी झालेली आहे. तरी उद्या सर्वांनी जामखेड बंद ठेऊन आपल्या या शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या उपोषणाला जाहीर पाठींबा आहे हे दाखवुन आपली पालक म्हणुन जबाबदारी पार पाडावी.






