व्यक्तीमत्व विकासासाठी खेळ आवश्यक -पोलीस निरीक्षक महेश पाटील राज्यस्तरीय वुशू स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता आदित्य जायभाय व रजत पदक विजेता श्रेयस वराट चा सत्कार संपन्न
व्यक्तीमत्व विकासासाठी खेळ आवश्यक -पोलीस निरीक्षक महेश पाटील
राज्यस्तरीय वुशू स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता आदित्य जायभाय व रजत पदक विजेता श्रेयस वराट चा सत्कार संपन्न
खेळाच्या माध्यमातून संघ भावना वाढते एकमेकांविषयी आदर निर्माण होतो. बंधूभाव वाढतो. त्याप्रमाणे सर्वाधिक नेतृत्व गुण खेळाच्या व स्पर्धेच्या माध्यमातून विकसित होत असतात. त्यामुळे व्यक्तिमत्त्वाचा विकास करायचा असेल तर खेळ हे अत्यंत महत्त्वाचा आहे असे मत पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी सांगितले.
ऑल महाराष्ट्र वुशु असोसिएशनच्या वतीने अमरावती येथे झालेल्या राज्यस्तरीय ज्युनिअर व सब ज्युनिअर वुशु अजिंक्यपद स्पर्धेत अदित्य जायभायला सुवर्णपदक व श्रेयस वराटला रौप्य पदक मिळाले याबद्दल जामखेड पोलीस स्टेशनमध्ये सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस निरीक्षक महेश पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. मधुकर राळेभात, शिक्षक नेते केशव कोल्हे, श्याम पंडित, पप्पू सय्यद, आजिनाथ जायभाय, जाधव, महामुनी यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना महेश पाटील म्हणाले की, व्यक्तिमत्व म्हणजे माणसाचा सर्वांगीण विकास होय, या सर्वांगीण विकासामध्ये शारीरिक व मानसिक सदृढता महत्त्वाची असते. खेळाच्या माध्यमातून व्यक्ती सदृढ बनते व व्यक्तिमत्व विकास होतो. त्याचे दिसणे, त्याचे वागणे, चालणे, बोलणे या बाबी खेळांच्या माध्यमातून जास्तीत जास्त विकसित होत असतात. मानसिक विकासामध्ये खेळाडू हा खेळाच्या माध्यमातून सक्षम बनत असतो. त्याच्यामध्ये संयम वाढतो.
यावेळी बोलताना प्रा. मधुकर राळेभात म्हणाले की ‘खेळाच्या माध्यमातून संघ भावना वाढते एकमेकांविषयी आदर निर्माण होतो. बंधूभाव वाढतो. त्याप्रमाणे सर्वाधिक नेतृत्व गुण खेळाच्या व स्पर्धेच्या माध्यमातून विकसित होत असतात. खेळाडूंमध्ये खेळांच्या माध्यमातून, स्पर्धांच्या माध्यमातून एकमेकांविषयी आदर भावना तयार होते, बंधुभाव तयार होतो व नेतृत्वगुणही वाढीस लागत असतात. व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे तणावापासून मुक्त असणे. खेळ हे मानवाला तनावातून मुक्त करण्याचे काम करतात.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्याम पंडित यांनी तर आभार जाधव यांनी मानले.