जामखेड न्युज—–
मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे – अब्दुल सत्तार इनामदार
काँग्रेसच्या काळात असलेली शिष्यवृत्ती सुरू करावी

काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असतात शालेय मुस्लिम मुलांना शिष्यवृत्ती मिळत होती ती भाजपा सरकारने बंद केली आहे ती पुन्हा सुरू करावी तसेच
मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे म्हणून एक चळवळ सुरू केली आहे. यासाठी संपूर्ण राज्यात आरक्षण मोहीम सुरू केली आहे असे मत महाराष्ट्र मुस्लिम विकास परिषदेचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अब्दुल सत्तार इनामदार यांनी जामखेड येथे सांगितले.

अब्दुल सत्तार इनामदार हे जामखेड येथे आले असता मुस्लिम विकास परिषद व मुस्लिम पंचकमिटी च्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी महाराष्ट्र मुस्लिम विकास परिषदेचे अध्यक्ष काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अब्दुल सत्तार इनामदार, मुहम्मद इलियास कच्ची जिल्हाध्यक्ष परभणी, हाजी शरिफ शेख शहर जिल्हा अध्यक्ष मुस्लिम विकास परिषद, शेरखान चाचा अध्यक्ष मुस्लिम विकास परिषद पश्चिम महाराष्ट्र, शरिफभाई शेख, शमाभाईहाजी कादर तालुकाध्यक्ष वकिल संघ जामखेड, हाजी नादिरभाई, उमरभाई कुरेशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक अध्यक्ष, इस्माईल सय्यद माजी ग्रामपंचायत सदस्य तथा सचिव पंचकमिटी, मुख्तार सय्यद सहसचिव मुस्लिम पंचकमिटी शेख शकिल, मस्जिद पठाण, बब्बू शेख, आबेद कुरेशी, पप्पूभाई सय्यद यांच्या सह अनेक मुस्लिम बांधव उपस्थित होते.

यावेळी बोलताना इनामदार यांनी सांगितले की, कोणी कोणत्याही पक्षात काम केले तरी चालेल पण समाजाच्या प्रश्नांसाठी सर्वानी एकत्र काम केले पाहिजे. यावेळी शेरखान चाचा यांचे सर्वानीच कौतुक केले कारण या वयातही ते तरूणाला लाजवेल असे काम करत आहेत.

शालेय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती व मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी प्रामुख्याने केली.
यावेळी कार्यक्रमचे सुत्रसंचालन माजी ग्रामपंचायत सदस्य इस्माईल सय्यद यांनी केले.





