जामखेड न्युज——
राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने महाविकास आघाडीची सत्ता गेली आहे.शिवसेना बंडखोर आमदार व भाजपाचे सरकार स्थापन झाले आहे. या राजकीय घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी आपले मत व्यक्त केले. Rohit Pawar Latest news update

कालच मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी झाला याविषयी आमदार आमदार पवार यांनी जामखेड न्युजशी बोलताना सांगितले की,

नऊ दिवसांत बरच नाट्य सुरू होते पण तरीही सरकारकडून काम सुरू होती. लोकांचे मनात जे काही झालं त्याबद्दल खंत आहे. आम्ही आधी काम करत होतो आताही मतदारसंघात जाऊन काम करत राहणार. सत्तेत अडीच वर्ष काम केलं आता विरोधी बाकावर बसून काम करणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.









